माजी विद्यार्थी महादेव माळवदे यांनी जिल्हा परिषद बेलकुंड शाळेला साठ हजार रुपयांची दोन LED टीव्ही दिली भेट.

 माजी विद्यार्थी महादेव माळवदे यांनी जिल्हा परिषद बेलकुंड शाळेला साठ हजार रुपयांची दोन LED टीव्ही दिली भेट.




औसा प्रतिनिधी 

औसा तालुक्यातील बेलकुंड येथील रहिवासी महादेव माळवदे यांनी 32 इंची दोन LED टिव्ही किम्मत साठ हजार रुपये जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. 1971 मध्ये जिल्हा परिषद शाळा बेलकुंड येथे शिकत होते पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले पुण्यामधे शिक्षण घेऊन त्यांना नोकरी लागली. आज ते सेवानिवृत्त झाले आहेत आपल्या गावांतील जिल्हा परिषद शाळेला आपण शाळा शिकलो आहोत त्या शाळेसाठी काहीतरी करावे अशी इच्छा मनात होती विद्यार्थ्याला अभ्यासासाठी टीव्ही देण्याचा निर्णय घेतला व शाळेला भेट दिली त्यावेळी मुख्याध्यापक किरण पाटील, गोविंद शिंदे, मधुकर गोरे, गणेश दीक्षित, यांनी महादेव माळवदे यांचा सत्कार केला. त्यांनी शाळेला धनादेश चा चेक दिल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास तपासे, सरपंच विष्णु कोळी, उपाध्यक्ष माधुरी पाटील उपसरपंच सचिन पवार, तंटामुक्ती अध्यक्ष शकील शेख, पोलीस पाटील व्यंकट साळुंके, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ कांबळे, गोविंद वाघमारे यांनी अभिनंदन केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या