राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक,हासेगाव महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के

 *राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलीटेक्निक,हासेगाव महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के*




हासेगाव ता.औसा:येथील महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राजीव गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा हिवाळी २०२१ परीक्षेचा निकाल १००%  लागला आहे.महाविद्यालयामधून शिंदे सत्यजीत ९०.६०%प्रथम ,काळबांडे वैभव ८८.७५%द्वितीय आणि इम्रान पटेल ८८.७०% घेऊन तृतीय क्रमांक मिळवला आहे.

          याबरोबरच स्थापत्य अभियांत्रिकी विभागातून द्वितीय वर्षी सोनजी प्रवीण हा ८३.३३%घेऊन पहिला वालेकर ऋतुजा ८०.६७% घेऊन दुसरी आणि पठाण लकफ ७६.५६% घेऊन तिसरी आलेली आहेत.तिसऱ्या वर्षी स्वामी प्रथम ७५.६०% घेऊन पहिला शेटे संकेत ७४.००% दुसरा आणि शिंदे अनुजा ७२.१०% घेऊन तिसरी आली आहे. 

                  विद्युत अभियंत्रिकी विभागातून प्रथम वर्षी धनदुरे आतिष हा ६९.००% पहिला आणि जवळगेकर रोहन ६५.८६% घेऊन दुसरा आला आहे.द्वितीय वर्षी काळबांडे वैभव ८९.७५% घेऊन पहिला,घोडके महेश व सुरवसे निलेश ८५.००%घेऊन दुसरा आणि केंद्रे सोमनाथ ८४.६३% घेऊन तिसरा आलेला आहे.तृतीय वर्षी शिंदे सत्यजीत ९०.६०% घेऊन पहिला पटेल इम्रान ८८.७०% घेऊन दुसरा आणि सरतापे खंडू ७६.८०% घेऊन तिसरा आलेला आहे.

          यांत्रिकी विभागातून द्वितीय वर्षी पाटील अशोक ७९.२६% घेऊन पहिला शेख इम्रान ७८.१८% दुसरा आणि दहिदुळे मकरंद ७२.११% घेऊन तिसरा आलेला आहे.तृतीय वर्षी पाटील महेश ७५.९१% घेऊन पहिला आणि जगताप धीरज ७४.२४% घेऊन दुसरा आणि सोमवंशी सुमित ५६.७५% तिसरा आलेला आहे.

                    महाविद्यालयातील विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, संचालक आत्माराम मुलगे,  प्राचार्य संतोष मेतगे, उपप्राचार्या योगिता बावगे, प्रा. गायकवाड एस. एन, प्रा.पाटील वाय. पी, प्रा.पाटील डी.पी.,प्रा.राचुरे अनुराधा ,प्रा.पंचाक्षरी एस एम ,प्रा.गिरी डी.डी.,कदम जी.जे, ग्रंथपाल सवाई मनदीप यांनी  उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या