शैक्षणिक‘लातूर पॅटर्न'च्या यशात सर्वांचेच योगदान-प्राचार्य केंद्रे
शैक्षणिक ‘लातूर पॅटर्न'च्या यशात सर्वांचेच योगदान-प्राचार्य केंद्रे
लातूर : शिक्षण क्षेत्रात लातूरने आपला एक आगळा - वेगळा ‘पॅटर्न' निर्माण केला आहे. या ‘लातूर पॅटर्न'च्या यशात सर्वांचेच योगदान असून या ‘पॅटर्न'ला आणखी झळाळी देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन मराठवाडा पालक संघाचे सचिव तथा राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी केले.
राजमाता जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य संगमेश्वर केंद्रे यांच्या नेतृत्त्वाखाली येथील सूत मिल कंपाऊंडमध्ये सुरु करण्यात आलेल्या अन्वी गर्ल्स हॉस्टेलमधील स्विमिंग पुलाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डी. एन. केंद्रे बोलत होते. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, संस्थेच्या विधी सल्लागार राणी केंद्रे, समन्वयक राजेंद्र जायेभाये, प्रशांत बोंदर, प्रा. वैशाली केंद्रे, प्रा. अश्विनी केंद्रे, प्रा. कविता केंद्रे, मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, प्रा. करिश्मा केंद्रे, सोनाली केंद्रे, राजीव मुंढे, प्राचार्य गणपत मुंडे, विलास चौधरी, गित्ते आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डी. एन. केंद्रे म्हणाले की, सबंध राज्यभरात लातूरने शिक्षण क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचा लोंढा शिक्षणासाठी लातुरात येतो. या विद्यार्थ्यांमुळे लातुरातील व्यवहारात वाढ होऊन व्यवसाय वृद्धींगत होतात. त्यामुळे परजिल्ह्यातून लातुरात शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थिंनींना सर्व सोयी - सुविधा अन्वी गर्ल्स हॉस्टेलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेपासून ते त्यांच्या आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर आता लातुरात पहिल्यांदाच केवळ याच हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनींसाठी स्विमिंग पूलचीही सोय करण्यात आली आहे. लातुरात शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी येथील दर्जेदार शिक्षणाचा लाभ घेऊन यशाचे शिखर गाठावे, असे आवाहनही शेवटी प्राचार्य केंद्रे यांनी केले.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.