औसा न्यायालय इमारतीचा लोकार्पण सोहळा दिमाखात संपन्न

 *औसा न्यायालय इमारतीचा लोकार्पण सोहळा दिमाखात संपन्न ....*





      औसा न्यायालयाच्या नुतन इमारत लोकार्पण सोहळा उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबादचे पालक न्यायमुर्ती मंगेश शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. विधिज्ञ मंडळ इमारतीत आयोजित केलेल्या छोटेखानी परंतु भव्य कार्यक्रमात मंचावर न्यायमुर्तीं मंगेश पाटील हे सौ.संगिताताई पाटील यांच्या सह सपत्निक हाजर होते. त्याच्या सोबतच जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती सुरेखा कोसमकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. सह- जिल्हा न्यायाधिश गुजराथी साहेब, औसा न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश प्रसाद कोळेकर, सह-न्यायाधिश श्रीमती प्राची कुलकर्णी,  तहसीलदार भरत सुर्यवंशी,गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड.श्रीधर जाधव इत्यादींनी मंचाची शोभा वाढवली. प्रास्ताविकपर मनोगत मांडतांना अँड.श्रीधर जाधव यांनी मंजूर असून प्रलंबित असलेल्या वरिष्ठ न्यायालयासह इतर अनेक विषयावर लक्ष वेधत, विधि व न्याय विभाग तथा प्रशासकीय पातळीवर औसासाठी मदत तथा उपकृत करणे बाबत विनंती केली. न्यायमुर्ती महोदयांनी मार्गदर्शन करतांना सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून न्यायिक कार्य करणे गरजेचे असल्याचे सांगून औसा न्यायालयासाठी शक्य तितके प्रशासनिक सहकार्य करण्या बाबत आश्वस्त केले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन अँड.फिरोजखान पठाण व अँड.शाहनवाज यांनी केले तर अँड.अजिंक्य फत्तेपूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री अँड.मुजीब शेख,संतोष माडजे,एस.के झुल्फिखार,विशाल वागदरे,शालीवाहन शिंदे,संतोष बिराजदार,उन्मेष पाटील,संजय शिंदे,रोशन काझी,अभय पवार,दत्ता घोगरे,रफीक शेख,जयराज जाधव,गजेंद्र गिरी,भाऊसाहेब सगट,सिराजोद्दीन पटेल,सुदर्शन गिरीसह सर्वच विधिज्ञांनी मेहनत घेतली.तसेच ज्येष्ठ विधिज्ञ सर्वश्री अँड.मुक्तेश्वर वागदरे,ए.जी.कुलकर्णी,एन.जी.लोहारे,एन.डी.फत्तेपूरकर,पी.व्ही.कोव्हाळे,आर.पी.देशपांडे,बी.जी.पाटील,एच.आर.पाठक,एस.डी.भाग्यवान,तथा अन्य इतर ज्येष्ठ विधिज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या