*
*हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांवर छापा, 3 लाख 53 हजाराचा मुद्देमाल जप्त, 06 गुन्हे दाखल, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.*
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी दिलेले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे ,अपर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी, लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वाखाली कोराळवाडी येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणारे 06 इसमावर स्थानिक गुन्हे शाखा,लातूरच्या पथकाने आज दिनांक. 10/04/2022 रोजी सकाळी छापामारी केली. यामध्ये 5,600 लिटर रसायन , साहित्य तसेच 175 लिटर हातभट्टीची दारू असा एकूण किंमत 3 लाख 53 हजार रुपये चे रसायन, हातभट्टी दारू आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नाश करण्यात आले आहे
या कार्यवाहीत
1) शंकर मोहन बुकले, राहणार कोराळवाडी
2) किशन सुभाष बुकले, राहणार कोराळवाडी
3) उमेश पंडित बुकले, राहणार कोरड वाडी
4) व्यंकट दौलाप्पा रेवणे, राहणार कोरड वाडी
5) राम अण्णा सबदाडे, राहणार कोरडेवाडी
6) विकास अंगत गायकवाड, राहणार कोराळवाडी
अशा एकूण 06 आरोपीवर पो.ठाणे कासारशिरशी येथे
1) गुन्हा रजिस्टर नंबर 73/2022 कलम 65 (फ)(इ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949
2) गुन्हा रजिस्टर नंबर 74/22 कलम 65 (फ)(इ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949
3) गुन्हा रजिस्टर नंबर 75/22 कलम 65 (फ)(इ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949
4) गुन्हा रजिस्टर नंबर 76/22 कलम 65 (फ)(इ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949
5)गुन्हा रजिस्टर नंबर 77/22 कलम 65(फ)(इ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949
6)गुन्हा रजिस्टर नंबर 78/22 कलम 65(फ)(इ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949
असे एकूण 06 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन द्रोणाचार्य सहाय्यक फौजदार संजय भोसले, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड , जमीर शेख , माधव बिलापटे, राजू मस्के , रवी गोंदकर, खुर्रम काजी , यशपाल कांबळे, प्रकाश भोसले ,बंटी गायकवाड ,नवनाथ हसबे, विनोद चिलमे, सिद्धेश्वर जाधव, केंद्रे, नकुल पाटील तसेच पोलीस ठाणे कासार शिरशी येथील पीएसआय गजानन क्षीरसागर ,पोलीस अमलदार घोरपडे ,भोग , पोलीस अंमलदार हिंगमिरे, जाधव ,सोनटक्के यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.