*जकात निधीतून महिलांना आत्मनिर्भर करण्याचा खादिमाने उर्दू फोरमचा उपक्रम*
सोलापूर- ‘जकात हे इस्लाम धर्मात अत्यंत उत्कृष्ट स्रोत आहे जे सर्वांनी अमलात आणली पाहिजे ज्यामुळे समाजातील आर्थिक विषमता दूरहोण्यास मदत होते. महिलांना आत्मनिर्भर या माध्यमातून करण्याचा खादिमाने उर्दू फोरमचा प्रयत्न कौतुकास्पद आहे’असे उद्गार पोलीस उपनिरीक्षक फौजदार चावडी संजीवनी व्हट्टे यांनी काढले. खादिमाने उर्दू फोरमच्या अर्थ सहाय्याने फॅशन डिझाईनिंग कोर्समध्ये उत्तीर्ण विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमांत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कामिनी गांधी इन्टि नट्यूटच्या संचालिका कामिनी गांधी होत्या.
सौ. व्हट्टे यांनी पुढे सांगितले की, महिलांना आत्मनिर्भर करणे काळाची गरज आहे. अध्यक्षा सौ. कामिनी गांधी यांनी या कोर्सची सविस्तर माहिती दिली. मुस्लीम महिला या क्षेत्रात भरीव कामगिरी करू शकतात. त्यांच्यात ही कला त्यांना मोठे उद्योजक करू शकते.
प्रास्ताविकात फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख यांनी सांगितले की, ज्या ड्रापआऊट विद्यार्थिनींने जकात निधीतून आपला कोर्स पूर्ण केला आहे त्यांनी आपला कॅरिअर या क्षेत्रात करून पुढे जकात देण्या एवढे सक्षम व्हायला हवे म्हणजे हा उपक्रम यशस्वी मानला जाईल. सौ. व्हट्टे व गांधी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रतसंचालन अ. मन्नान शेख यांनी आपल्या शायरीतून पाहुण्यांची दाद मिळविली. समन्वयक रफीक खान यांनी आभार मानले. शफी कॅप्टन शेख, सुल्तान जानवाडकर व पालक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.