डॉ प्रा खलील सिद्दीकी यांना उर्दू साहित्य अकादमीचा विशेष पूरस्कार घोषित

 डॉ प्रा खलील सिद्दीकी यांना उर्दू साहित्य अकादमीचा विशेष पूरस्कार घोषित





लातूर :महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी  महाराष्ट्र शासनाच्या वतीने   राष्ट्रीय, राज्यस्तरीय, व विशेष पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून राज्यस्तरीय विशेष पूरस्कार २०१९-२० साठी औसा येथील प्रा. खलील सिद्दीकी यांची निवड करण्यात आली आहे.. उर्दू भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योगदान दिल्या बद्दल हा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार डॉ प्रा खलील सिद्दीकी यांना देण्यात येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.. मंत्रालयाच्या वतीने लवकरच हा पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याचे उर्दू अकादमीचे कार्यकारी अधिक्षक श्री शोएब हाश्मी यांनी म्हटले आहे..

डॉ प्रा खलील सिद्दीकी यांची विविध विषयांवर एक्केविस पुस्तके प्रकाशित झाली असून ४ पुस्तके बालसाहित्य. ८ पुस्तके संशोधनावर तर चार काव्य संग्रह आहेत. तसेच २००हून जास्त शोध निबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पत्रिकेत प्रकाशित झाली आहेत.. पानगाव येथील रहिवासी असलेले  व  हिन्दुस्तानी एज्युकेशन सोसायटी औसा येथील पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉ खलील सिद्दीकी यांना तिसऱ्यांदा महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार घोषित झाला आहे.. बालभारती  व राज्य परिक्षा मंडळ पुणे व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथील अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत तसेच डॉ खलील सिद्दीकी यांच्या उर्दू भाषेतील विशेष योगदानाची दखल घेऊन राजस्थान विद्यापीठाच्या उर्दू विभागात पी. एच. डी चे मार्गदर्शन म्हणून ही डॉ सिद्दीकी यांची निवड झालेली आहे..

डॉ प्रा खलील सिद्दीकी यांना उर्दू साहित्य अकादमी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विशेष पूरस्कार घोषित झाल्या बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या