निराधार व श्रावणबाळ योजना येथील महिलांना तहसीलदार यांच्या हस्ते मंजुरी पत्र वाटप
औसा प्रतिनिधी तालुक्यातील नागरसोगा ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील विधवा परित्यक्ता अपंग निराधार व वयोवृद्ध महिलांना श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या वतीने मानधन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देण्यात आले होते दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करीत सरपंच सौ सरोजा भास्कर सूर्यवंशी आणि उपसरपंच बंडू मसलकर यांनी गावातील पात्र लाभार्थ्यांचे माहिती एकत्रित करून सर्व कागदपत्र आणि शी संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचा प्रस्ताव तहसील कार्यालयामध्ये दिला होता या प्रस्तावावर तहसील कार्यालयाच्या संजय गांधी निराधार समितीच्या वतीने उचित कार्यवाही करून पात्र व मंजुर लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र तहसीलदार भरत सूर्यवंशी यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य भास्कर सूर्यवंशी उपसरपंच बंडू मसलकर व लाभार्थी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.