एकंबा गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे (प्रतिरूप) अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण
लक्ष्मण कांबळे
बसवकल्याण तालुक्यातील एकंबा गावात क्रांतिसूर्य महामानव भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरतन बोधिसत्व प पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिरूप अर्थात अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम दिनांक २६ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता करण्याचे आयोजित करण्यात आले आहे .बसवकल्याण तालुक्यातील व आजूबाजूच्या परिसरातील सर्व बौद्ध उपासक व उपसिका बालक बालिका यानी कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी भीमशक्ती मित्र मंडळ एकंबा च्या वतीने विनंती करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवकल्याण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मा संजीवकुमार वाडीकर तर उदघाटक म्हणून माजी मंत्री तथा आमदार चितापुर मा प्रियांक खर्गे हे हजर राहणार आहेत तसेच भन्ते सुमेध नागसेन बौद्ध लेणी खरोसा, मिलिंद गुरुजी बौद्ध धम्म प्रचारक उमापूर, भन्ते अमरज्योति बेळमगी, यांची धमदेसना होणार आहे तसेच, भीमगीताच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करणारे भीमशाहीर साहेबराव येरेकर याचे प्रबोधन होणार असल्याचे आयोजकांनी आमच्या प्रतिनिधीशि कळवले आहे .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.