*प्रतिनिधी समीर तांबोळी*
किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुक मदन भोसले यांनी लढवू नये साजिद मुल्ला शेतकरी नेते
किसनवीर साखर कारखाना हा मदन भोसले यांच्या कडे काही वर्षे आहे सुरूवातीच्या काळात कारखाना हा बरा चालला नंतर या कारखान्याने दोन युनिट चालवायला घेतले त्यामुळे किसन वीर कारखान्याचे नियोजन कोलमडले एक दोन वर्षाची उस बिले मदन भोसले यांनी अद्याप ही शेतकऱ्यांना दिली नाहीत दोन दोन वर्षे उस सांभळावा लागतो यावेळी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अनेक शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस घातला आहे पण वर्ष झाले पण शेतकऱ्यांना अजूनही बिले कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना दिली नाहीत अशातच किसनवीर ची निवडणूकीची रणधुमाळी चालू झाली आहे अनेक जणांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे शेतकऱ्यांच्या मधून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत मदन भोसले यांच्या नियोजन शुन्य कारभारामुळे कारखाना अडचणीत आला साखर आयुक्त यांनी कारवाई केली मदन भोसले यांनी निवडणूक न लढवता जो कारखाना चांगल्या पध्दतीने चालवेल त्यांच्या पाठीशी उभे राहावे अन्यथा का कारखाना राजकीय अड्डा बनेल असे शेतकरी नेते साजिद मुल्ला यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.