विकी सोलार इंटरप्राईजेस चा शुभारंभ
औसा प्रतिनिधी
औसा येथील विकी सोलार इंटरप्राईजेस अँड मल्टी सर्व्हिसेस या उपक्रमाचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आमदार अभिमन्यु पवार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रभारी संतोषप्पा मुक्ता, तालुका अध्यक्ष सुभाष जाधव, माजी नगरसेवक मुन्ना वागदरे, धनराज परसने, सुधाकर लोकरे, पत्रकार राम कांबळे, हनुमंत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. विकी सोलार इंटरप्राईजेस अँड मल्टी सर्विसेस च्या माध्यमातून ग्राहकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात येणाऱ्या काळात सौर ऊर्जा उपक्रमाला केंद्र आणि राज्य शासन प्रस्थान देणार आहे असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.