वाहनांवरील अनपेड दंड न भरणार्‍यांवर मा.न्यायालयात खटले दाखल होणार



*वाहनांवरील अनपेड दंड न भरणार्‍यांवर मा.न्यायालयात खटले दाखल होणार*






लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

          लातुर जिल्हा वाहतुक नियंत्रण शाखेमार्फत आवाहन करण्यात येत आहे की, वाहनधारकांनी आपापल्या वाहनांवरील थकित दंड वाहतुक नियंत्रण शाखा, लातुर या ठिकाणी भरुन घ्यावा. जे वाहनधारक अनपेड दंड भरणार नाहीत त्या वाहनांना भविष्यात इन्शुरन्स,पीयुसी तसेच इतर प्रक्रियेकरिता मज्जाव केला जाऊ शकतो.  

              सन 2019 ते आजपावेतो 1,18,108   वाहनांवर लातूर  शहरातील अनपेड चलन संख्या 2,15,383 एवढी असुन एकुण थकित दंडाची रक्कम 8,81,94,100/- एवढीआहे.    

              वाहनचालकांनी आपल्या वाहनांवरील अनपेड दंड तात्काळ वाहतुक नियंत्रण शाखा,लातुर येथे किंवा https://mahatrafficechallan.gov.in/payechallan या लिंकवर आॅनलाईन भरावा.जे वाहनचालक त्यांचे वाहनावरील प्रलंबित दंड भरणार नाहीत त्यांच्यावर मा.न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार आहेत.

              मोटार वाहन कायदा हा गांर्भियाने पाळला जाऊन त्याचे समाजात महत्तव वाढावे. जेणेकरुन वाहतुकीच्या नियमांचे अधिकाअधिक पालन होऊन अपघातांची संख्या व अपघातात मृत्यीमुखी पडणार्‍यांची संख्या कमी होईल हा या मागचा उद्देश आहे.

           लातुर जिल्हयामध्ये मागील वर्षी 618 अपघात घडले असुन त्यात 293 लोकांचा मृत्यु झाला व 245 जण गंभीर जख्मी झालेले आहेत.दुचाकीस्वारांचे 333 अपघात घडले असुन 162 दुचाकीस्वार मृत्युमुखी पडले आहेत.पादचार्‍यांचे 142 अपघात घडले असुन 66 पादचार्‍यांचा मृत्यु झाला आहे.

एकंदरीत अपघातांचे अॅनालिसिस करुन अपघातांची संख्या व मृत्युदर कमीत कमी कशी होईल या दृष्टीकोनातुन वाहतुक नियंत्रण शाखेकडुन उपाययोजना केल्या जाणार आहेत.

             लातुर सायबर सेलच्या मदतीने वाहनधारकांना बल्क मॅसेज सिस्टीम द्वारे दंड भरण्यासाठी लातुर पोलीस दलातर्फे आवाहन केले गेले आहे.अनपेड दंड न भरल्यास मा.न्यायालयात वाहनधारकांवर खटले दाखल केले जाणार असल्याचे बल्क मॅसेजद्वारे पुर्वसुचना देऊन कळविले गेले आहे.अनपेड दंड भरुन मा.कोर्टात खटला टाळावा असे आवाहन वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला,पोलीस उप निरीक्षक आवेज काझी,अय्युब शेख यांनी वाहनधारकांना केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या