https://youtu.be/vgCOPrB6ZPs
आजादी का अमृत महोत्सव निमित्त औसा ग्रामीण रुग्णालयात आरोग्य मेळावा शिबिर संपन्न..
औसा मुख्तार मणियार
आजादी अमृत महोत्सव निमित्ताने आरोग्य मेळावा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्या अनुषंगाने आज दिनांक 19 एप्रिल 2022 मंगळवार रोजी औसा ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम जनजागृती व मोफत विशेषज्ञ यांच्या मार्फत आरोग्य मेळावा शिबिरामध्ये स्त्री रोग,बाल रोग,भिषक, शल्यचिकित्सक,नेत्र रोग,दंत रोग, अस्थिरोग,स्त्रियांचे सर्व आजार,हाडांचे सर्व आजार या सर्व आरोग्य मेळावा शिबिरामध्ये मोफत तपासणी करून महिला व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.या आरोग्य मेळावा शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.औषध गोळ्या देण्यात आले.यावेळी या शिबिरामध्ये आमदार अभिमन्यु पवार यांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यांत आली.या कार्यक्रम प्रसंगी हा आरोग्य मेळावा शिबिर ठेवण्याचा त्या मागचा उद्देश असा आहे की त्या ठिकाणी जे काही ग्रामीण भागामध्ये लोक काम करत असतात,पण स्वतःच्या तब्येतीकडे ते लक्ष देत नाहीत,त्यांना आजार होऊ नये या दृष्टीतून जे काही थर्टी फर्स्ट पापुलेशन आहेत,आणि इतर आजाराचे रुग्ण आहेत,मग ते एनडीएचे असतील,-हदयरोग असतील, त्यांच्यामधील पॅरालेसचे असतील, कॅन्सर चे असतील, मधुमेह असेल इतर सर्व आजाराचे स्किनीतून या ठिकाणी आज आपण स्पेशलीस्ट सर्व्हिस देण्यासाठी निवडक रुग्णालय खोलण्यात आले.असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या कार्यक्रम प्रसंगी औसा ग्रामीण रूग्णालयचे आरोग्य अधिक्षक डॉ अंगद जाधव कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.