कुरान शरीफ पठन चा जयश्रीताई उटगे यांचा अनोखा उपक्रम
औसा प्रतिनिधी औसा नगर परिषदेच्या माजी नगरसेविका तथा शिवसेनेच्या महिला आघाडीच्या संघटिका सौ.जयश्रीताई उटगे या मागील 12 वर्षापासून पवित्र रमजान महिन्यांमध्ये कुरान शरीफचा पठान चा उपक्रम राबवितात. आळंद येथील लांडे मशाक दर्गा ही त्यांचे कुलदैवत असून या दर्ग्याच्या कुलदैवता मुळे आपली प्रगती झाली असून पवित्र रमजान महिन्यामध्ये आपण सर्व धर्मीय समभाव जोपासना करीत हिंदू-मुस्लीम भाई भाई असा संदेश देण्यासाठी व सर्वधर्मसमभाव हाच खरा मानवधर्म आहे ही भावना मनात बाळगून आपण हा उपक्रम राबवित असल्याची माहिती त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली जयश्रीताई उटगे यांनी रमजान महिन्यात कुरान शरीफचा पठण करून हिंदू आणि मुस्लिम यांच्यात स्नेहभाव वाढावा या उद्देशाने हा उपक्रम राबविला आहे. त्यांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.