आलमला येथे चाकूर च्या धर्तीवर साकारणार लिंगायत स्मशानभूमी

 आलमला येथे चाकूर च्या धर्तीवर साकारणार लिंगायत स्मशानभूमी





औसा प्रतिनिधी

 आलमला गावातील लिंगायत स्मशान भूमी चाकूर च्या धर्तीवर करण्याचा समाजाचा मोठा संकल्प आलमला गावातील सर्वं लिंगायत समाज बांधवाची बैठक घेण्यात आली.

सदरील बैठकीत एकमुखी निर्णय घेण्यात आला,चाकूर धर्तीवर लिंगायत स्मशान भूमी मधील रस्ता मजबुतीकरण करणे,तार कंपाऊड करणे,झाडे लावणे व सुशोभिकरण व इतर ही कामे करणे असे समाजातील सर्वं बांधवांनी निर्णय घेऊन नियोजन करण्यात आले.सदरील कामाला लागणारा निधी हा समाजातील बांधवांकडून जमा करण्यात येणार आहे आणि निधी जमा होण्यास खूपच उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

दि.07 एप्रिल 2022 गुरुवार रोजी  स्मशान भूमीचे उदघाटन जेष्ठ नागरिक व सर्वं तरुण मंडळी यांच्या समवेत प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या