औसा येथे ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष रथयात्रा

 औसा येथे ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष रथयात्रा





औसा प्रतिनिधी

ओबीसी आरक्षण बचाव महाराष्ट्र राज्याचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे ओबीसी चे गेलेले आरक्षण ते आरक्षण परत मिळविण्यासाठी येत्या 17 मे ला आझाद मैदान मुंबई येथे एल्गार मोर्चाचे आयोजन केलेले आहे. ते आता रस्त्यावरची लढाई लढवून,प्रेशर तयार करून या ओबीसी आरक्षणाला तुम्ही विरोध केला आहे.त्याच्यापासून सुंदर सा मॅसेज पाठविण्यासाठी रस्त्यावरची हक्काची लढाई लढविण्यासाठी येत्या 17 मे 2022रोजी सर्व पक्षीय ओबीसी आरक्षण आमच्या हक्काचं म्हणून आपण स्वयंस्फूर्तीने लाखोंच्या संख्येने आझाद मैदान मुंबई येथे होणा-या आरक्षण ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मोर्चेत प्रत्येक गांवा-गांवातून व शहरातून उपस्थित राहावे असे आवाहन ज्योती क्रांती परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रमेश नागनाथ बारसकर यांनी 7 एप्रिल 2022 गुरुवार रोजी शासकीय विश्रामगृह औसा येथे पत्रकार परिषद घेऊन ओबीसी संघर्ष रथयात्रा किल्ला मैदाना पासुन ते गांधी चौक मार्गे ते बस स्थानक ते औसा टी पॉइंट पर्यंत काढण्यात आली. या संघर्ष रथयात्रेमध्ये  ओबीसी ची जातीनिहाय जनगणना तात्काळ करावी.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये 340 लागू केले आहे.त्याची पूर्ण अंमलबजावणी करावी व मंडळ आयोग जसाच्या तसा लागू करावा.भटक्या विमुक्त जमातींना आदिवासी एस.टी. प्रवाहात समाविष्ट करावे.52 टक्के राजकीय आरक्षण ओबीसी यांना तत्काळ मिळावे.50 टक्के आरक्षण मर्यादा वाढवून इतर जातीना ही आरक्षण द्यावे अश्या विविध मागण्या घेऊन ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष रथयात्रा आझाद मैदान मुंबई येथे एल्गार मोर्चाचे आयोजन केलेले आहे.तरी या संघर्ष रथयात्रेच्या निमित्ताने आपण बहुसंख्येने उपस्थित रहावे.आपल्या शहरात रथयात्रेच्या निमित्ताने औसा येथे आलेले आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.यावेळी पत्रकार परिषदेत औसा नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख,बेलकुंडचे सरपंच विष्णू महाराज कोळी, राजीव कसबे,  अस्लम पठाण,बालाजी शिंदे,ज्योती क्रांती परिषदेचे एन जी माळी,भरतजी पेठकर, मारुतीराव रोकडे,सुधाकर सोनटक्के, अतुल क्षीरसागर,सागर असूड,सुलतान भाई पटेल, गुणवंत क्षीरसागर,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या