पोस्टातली आर डी रक्कम मिळवण्यासाठी वृद्ध महिलेची कसरत

 पोस्टातली आर डी रक्कम

मिळवण्यासाठी वृद्ध महिलेची कसरत






शिवाजी भातमोडे, खरोसा

वार्ताहर दि.  4 एप्रिल 2022


       खरोसा ( ता. औसा ) येथील   शाखा पोस्ट मास्तरने एजंट आयडी असतानाही पासबुकवर कमिशनच्या लालशेपोटी पोस्टचा नियमबाह्य शिक्का मारल्यामुळे वृद्ध महिलेच्या आरडीची मुदत संपूनही रक्कम मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.


       खरोसा येथील लक्षीमिबाई पंढरी भातमोडे यांनी 29 मार्च 2017 रोजी दरमहा दोनशे रु. ची  पोस्टातली आरडी काढली. सदर दरमहा रक्कम पोस्टाच्या एजंट ऐवजी शाखा पोस्ट मास्तर माधव पाटील यांनी जमा केली आणि  कमिशनच्या लालसेपोटी नियमबाह्य पोस्टाचा पासबुकवर शिक्का मारल्यामुळे      मुदत संपूनही सदर जमा असलेली रक्कम  मिळण्यास टाळाटाळ केली जात आहे.


      यासंदर्भात  निलंगा येथील सब पोस्ट मास्तर संतोष अंतरेड्डी यांच्याकडे  वृद्ध महिला लक्षीमिबाई  यांना घेऊन त्यांचा मुलगा सुरेश भातमोडे, शिवाजी भातमोडे आणि खरोसा शाखा पोस्ट मास्तर गेलो असता अंतरेड्डी यांनी खरोसा पोस्ट मास्तर यांनी पासबुकवर नियमबाह्य शिक्का उमटविला असल्याचे सांगितले. माधव पाटील यांच्या यापूर्वीही अनेक तक्रारी आम्ही वरिष्ठांकडे केल्याचे अंतरेड्डी यांनी सोमवारी सांगितले.

      लक्षीमिबाई या खूप वयोवृद्ध असून अंथुरणाला खिळून आहेत, आशा अवस्थेतही त्यांना निलंगा पोस्ट ऑफिस मध्ये घेऊन गेले असता तेथील सब पोस्ट मास्तर संतोष अंतरेड्डी यांनी खरोसा पोस्ट मास्तर माधव यांनी केलेल्या अनेक चुकांचा पाढा वाचला आणि वृद्ध लक्षीमिबाई यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.


मो. 9011339173.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या