*अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा दि. २५ ते ३० एप्रिल दरम्यान मराठवाडा दौरा*
प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत साधणार समता परिषदेच्या पदाधिकारी आणि समता सैनिकांशी संवाद
बीड / प्रतिनिधी
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारणीत नुकतेच फेरबदल करण्यात आले असून राज्यभरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने आढावा बैठका घेण्यात येत आहे. दि.२५ व ३० एप्रिल २०२२ दरम्यान समता परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना. छगनरावजी भुजबळ साहेब, मा.समीरभाऊ भुजबळ, मा.पंकजभाऊ भुजबळ , मा. बापूसाहेब भुजबळ यांच्या आदेशावरून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यात विविध ठिकाणी आढावा बैठका घेण्यात येणार असून यावेळी प्रदेश सचिव रवीभाऊ सोनवणे , प्रदेश प्रचारक प्रा. संतोष विरकर यांची उपस्थिती राहणार आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मराठवाड्यात सहा दिवसीय दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत,प्रदेश सचिव रवी सोनवणे, प्रदेश प्रचारक संतोष विरकर यांच्या उपस्थितीमध्ये दि.२५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता उस्मानाबाद जिल्हा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर दि.२६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता लातूर जिल्हा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. दि. २७ एप्रिल रोजी नांदेड जिल्हा तर दि. २८ एप्रिल रोजी हिंगोली जिल्हा येथील आढावा बैठक होणार आहे. दि. २९ एप्रिल रोजी सकाळी११:०० वाजता परभणी तर दुपारी४:०० वाजता जालना जिल्हा आढावा बैठक होणार असून या मराठवाडा दौऱ्याची सांगता दि. ३० एप्रिल रोजी औरंगाबाद येथे औरंगाबाद जिल्ह्याची आढावा बैठक घेऊन करण्यात येणार आहे.या बैठकीस जास्तीत जास्त समता सैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सुभाष राऊत, प्रदेश सचिव रवी सोनवणे,नागोराव माळी, प्रदेश प्रचारक संतोष विरकर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.