रमजान महिना

 * *रमजान महिना* *





बारा महिन्यातील पवित्र हा महिना

होतात सर्व पूर्ण, मनीच्या  कामना


पंचवेळची नमाज सोबती'तरावीह'

तन-मन, पाक होते, जाते खराबी


'रोजा' धरूनी ये, शरण मला तू

खजिना खुला, घे हवे तेवढे तू


अन्न, पाण्याची किंमत, तुम्हा कळू दे

पंचेंद्रियांना तुमच्या रे सन्मार्गी वळू दे


सदका द्या घरातल्या साऱ्या जीवांचा

विधवांनाही हक्क मिळूदे तयांचा


शेजारी आपला भाऊच खरे तर

त्याचीही रोज थोडी  फिकर कर


आसरा दे अनाथा, दे मायेचा कर

कटू सोडूनी दे, सर्वांना क्षमा कर


तुझ्या संपत्तीची वाटनी अशी कर

मुलींनाही समान वाटा आधी धर


जन्म नाही हा फिरुनी पुन्हा तर

एकदा तरी रे जीवनी 'हज' कर


ठेव साठवूनी पुण्य तुझ्या उशाशी 

जन्नतमध्ये रोज खाशील तुपाशी


शांतीचा आदेश जगाला जुळू दे

'कुरआन' संदेश मानवा कळू दे


वाय.के.शेख

पारगाव, पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या