वैश्विक सत्य
मराठी मुसलमान
हाक येई माझ्या कानी
अरबी सागरातून
इस्लामची मेजवानी
भारतीय भूमीवर
नमाज अदा व्हायची
इस्लामचा संदेश हा
माणूसकी पेरायची
इल्म हाच आहे पाया
धर्म सांगे हा इस्लाम
अल्लाचे नामस्मरण
सर्वांना माझा सलाम
भुकेल्यांना अन्नदान
सत्यासाठी बलिदान
इस्लामची शिकवण
थोरांचा करा सन्मान
इस्लाम धर्म वैश्विक
कळू लागे जेव्हां लोका
लोक लागे आता म्हणू
अल्लापुढे सारे झुका
- शेख शफी बोल्डेकर,
कळमनुरी.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.