समतेचा विचार घेऊन बौद्धमय भारत करण्यासाठी येणाऱ्या जनगणनेत दक्षता घ्यावी;भीमराव आंबेडकर यांचे आवाहन

 समतेचा विचार घेऊन बौद्धमय भारत करण्यासाठी येणाऱ्या जनगणनेत दक्षता घ्यावी;भीमराव आंबेडकर यांचे आव्हान





औसा-भारतरत्न बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा विचार घेऊन बौद्धमय भारताचे स्वप्न उराशी बाळगले होते.

1956 पासून त्यांनी प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करून समाजात बहिष्कृत झालेल्या व्यक्तींना मानसन्मान मिळवून देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगवेगळ्या संघटना काढून देशभरामध्ये जनजागृती केली इतर समाजातील कुणाच्याही भावना न दुखावता समतेचा विचार घेऊन बौद्धमय भारत करण्यासाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या जनगणनेमध्ये प्रत्येक बौद्ध बांधवांनी जातीच्या रकाना मध्ये "बौद्ध"हा शब्द लिहिण्यास सांगून आपली सतर्कता दाखवून द्यावी. असे आवाहन अखिल भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केले.

औसा येथील भीम नगर येथे आयोजित बौद्ध धम्म परिषदेत संबोधित करताना दिनांक 31 मार्च रोजी भीमराव आंबेडकर बोलत होते.

यावेळी विचारपीठावर सर्वश्री बापूसाहेब गायकवाड,तालुका अध्यक्ष उद्धव लोंढे,रावसाहेब सूर्यवंशी,ॲड जयराज जाधव,धम्मदीप डांगे यांच्यासह अखिल भारतीय बौद्ध महासभेचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना बापूसाहेब गायकवाड म्हणाले

समाजातील उपेक्षित शोषित पीडित समाजाला डॉ बाबासाहेबांनी माणसात आणून माणूस पण निर्माण केले.माणसातली माणुसकी जपत बौद्धमय भारत करण्यासाठी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळात सर्व बौद्ध बांधवांनी तयारीला लागावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी भीमनगर येथे हजारो बौद्ध उपासक-उपासिका यांच्यासह आंबेडकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी औसा तालुका समता सैनिक दल,पीडी कंपनी व इतर सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या