पवित्र रमजान महिन्यात शहरातील प्रार्थनास्थळा समोरील स्वच्छता विद्युत रोशनाई करा पाणी वेळेत बदल करून दर आठवड्यात दोनदा नळ सोडण्यात यावा.
औसा रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
वरील विषयी एम. आय. एम. व मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन की पवित्र रमजान महिना 3 एप्रिल पासुन सुरु होत आहे. व या महिन्यात मशीदी समोरील स्वच्छता रोजाना करण्यात यावी व विशेष करुन प्रमुख रस्त्यावर बंद असलेली स्ट्रीट लाईट चालु करण्यात यावी. जेणे करुन मशीदीत येणाऱ्या नमाजसाठी जाणाऱ्या बांधवांची सोय व्हावी. तसेच संध्याकाळी इफ्तार नंतर व सकाळी या दोन सत्रास घंटागाडी मशीदीसमोर उभा करुन कचरा गोळा करण्यात यावा व नळाचा वेळ रमजानच्या महिन्यात ठराविक वेळ ठेवण्यात यावा. कारण पहाटे सहरी करुन नमाज पठण करुन आराम करत असताना तर सकाळी 9 ते 11 च्या वेळेस नळ सोडण्यात यावा. दर आठवड्यात दोनदा नळ सोडण्यात यावा
तरी वरील बाबींची गांभीर्यपुर्वक विचार करुन अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी
सय्यद मुजफ्फरअली इनामदार यांनी मुख्याधिकारी
नगर परिषद, औसा.याना केली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.