राष्ट्रवादीचे *झोपा काढो* आंदोलन संपन्न..
औसा नगरपालिकेच्या प्रशासक यांनी दिनांक 30 12 2019 रोजी औसा नगर परिषदेचा पदभार स्वीकारला आहे पदभार स्वीकारल्यानंतर मागील तीन महिन्यात ते नगरपालिकेकडे एकदाही फिरकले नाहीत त्यामुळे त्यांचे प्रशासनावर लक्ष नसल्यामुळे मुख्याधिकारी व इतर कर्मचारी यांच्या शहरात सेवा व्यवस्थित होत नाही, नागरिकांकडून मालमत्ता कर व नळपट्टी इत्यादी द्वारे लाखोंची वसुली करून जनतेच्या पैशाची लूट केली जात आहे. प्रसंगी नळांना खुट्टे मारणे व मालमत्तेची जाचक वसुली व जप्ती अशी कारवाई केली जात आहे शहरात स्वच्छतेबाबत नगर पालिकेचे दुर्लक्ष होत आहे, दुपार सत्रानंतर शहरात स्वच्छता केली जात नाही फक्त मुख्य रस्ता वरील कामे केले जात आहे शहरातील मोठ्या पोलवर व गल्लीबोळातील बंद असलेल्या लाईट बाबत कसलीच कारवाई केली जात नाही नगरपालिकेचे बांधकाम विभाग व नगर रचनाकार यांच्याकडून कागदपत्रांची मागणी करून व त्यांच्या पूर्ततेसाठी आर्थिक मागणी केली जात आहे, नप कार्यालयात दुपारनंतर कोणताही कर्मचारी नागरिकांना सेवेसाठी उपलब्ध नसतो
तसेच शहरातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या (जिल्हाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस) इशाऱ्यावर प्रशासक व मुख्याधिकारी व नगर अभियंता हे फक्त रस्ते नाल्या इत्यादी मालिदायुक्त विकास कामाचे काम करीत आहेत नागरिकांच्या दैनंदिन गरजाबाबत काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांकडून कसलीच कामे केली जात नाही फक्त विकास कामातील मध्ये मलिदा हडपण्यासाठी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी ची धडपड चालू आहे असा आरोप Dr अफसर शेख, मा नगराध्यक्ष,औसा तथा जिल्हाकार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस लातुर ग्रा यानी लावला आहे
*नळाला खुट्ट्या माराल तर..! अन जप्ती कराल तर...!!*
औसा नगर परिषद प्रशासनाच्या कर्तव्य शून्य कारभाराविरोधात व झोपी गेलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रतीकात्मक *"झोपा काढो"* आंदोलन
1.मालमत्ताधारक व नळ धारक यांची सक्तीची व जाचक कर वसुली थांबवावी
2.शहरातील बंद लाईट चालू करणे व हद्दवाढ परिसरात तार ओढणे
3. साईट अँड सर्विसेस येथील पाणी टाकी चालू करून तीन दिवसाआड पाणी देणे
4.शहरातील स्वच्छतेची कामे दुपार सत्रात व नाईट स्वीपिंग पूर्वीप्रमाणे चालू ठेवावी
5.स्पर्धा परीक्षा केंद्र येथे पुस्तके व वर्तमानपत्रे ठेवावे
6.नागरिकांना त्रास देणाऱ्या नगररचनाकार कर्मचाऱ्यास निलंबित करावे
7. औसा नप कौन्सिलने घेतलेला विकास कामाच्या ठरावाची अंमलबजावणी करावी
8.प्रशासक यांच्या नगरपालिकेत अवैध हस्तक्षेप थांबवावा
9.पावसाळापूर्व मोठ्या गटारीची साफसफाई करण्यात यावी
10. नवीन दहा बोरवेल ची डिमांडची रक्कम महावितरणकडे भरणे
11. बंद असलेला घंटा गाडीत दुरुस्त कराव्या
12. मोमीन गल्ली येथील व शहरातील नळाला पाणी सुरळीत करावे
13. नळाला पाणी न येणारे व बंद असलेल्या नळाची नळपट्टी माफ करावी.या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने झोपा काढो आंदोलन केले आहे.आज दिनांक 1 एप्रिल 2022 शुक्रवार रोजी काॅग्रेस कमीटीचे शहराध्यक्ष शकील शेख यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अमर खानापुरे, नगरसेवक अंगद कांबळे, जयराज कसबे,मुजम्मील शेख,बबन बनसोडे,स्व.विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुल्ला, हमीद सर आदिच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष डॉ अफसर शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते दत्तात्रय अण्णा कोळपे यांना भेटून आंदोलनास जनहित समोर ठेवून झोपा काढो आंदोलनला पाठिंबा दिला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.