उमर फारुख युवा मंच तर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन
औसा मुख्तार मणियार
औसा येथे रमजानच्या पवित्र महिन्यांमध्ये इफ्तार पार्टीच्या निमित्ताने एकतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने सर्व समाजातील बांधवांना एकत्रित करून पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन येथील उमर फारुख युवा मंचच्या वतीने औसा शहरातील कालन गल्ली येथील उमर फारुख मस्जिद मध्ये आज दिनांक 26 एप्रिल 2022 मंगळवार रोजी सायंकाळी 6 :45 वाजता यावर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.गेल्या दोन वर्षांत कोव्हीडने हाहाकार माजला होता, त्यामुळे काहीही कोणत्याही कार्यक्रमास शासनाकडून परवानगी देण्यात आली नव्हती. सर्वत्र कार्यक्रमास बंदी घालण्यात आली होती. यावर्षी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत पवित्र रमजान महिन्यात 2022 च्या इफ्तार पार्टीला शहरातील सर्व समाज बांधवांना उमर फारुख युवा मंच राज्य सरकारचे संस्थापक अध्यक्ष पप्पु भाई शेख यांच्या वतीने इफ्तार पार्टीस निमंत्रित करण्यात आले होते.पवित्र रमजान महिन्यातील 24 वा रोजा ( उपवास) दिवशी इप्तार पार्टी झाली.या इफ्तार पार्टीत शहरातील सर्व पक्षातील नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी प्रामुख्याने आमदार अभिमन्यु पवार, मौलाना इरफान सौदागर, पोलीस कान्सटेबल लामतुरे, हणमंत भैय्या राचट्टे, शाहनवाज पटेल, इम्रान सय्यद,शफीयोद्दीन नांदुग्रे, राजीव कसबे, पडसलगे सर,खाजाभाई शेख, कलीम शेख,अलीम शेख, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, संतोष मुक्ता, सुनील उटगे, भिमाशंकरप्पा राचट्टे,लहु कांबळे,विकास नरहरे,आदि भाजपच्या कार्यकर्त्यांसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.या इफ्तार पार्टीत उपस्थित राहिल्याबद्दल उमर फारुख युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष पप्पु भाई शेख यांनी आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.