श्रीराम नवमी निमित्त औसा शहरात अभूतपूर्व शोभायात्रा
औसा प्रतिनिधी
मर्यादापुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर औसा शहरात राम भक्तांनी दुपारी भव्य मोटारसायकल रॅली काढली होती. तर अभूतपूर्व शोभायात्रा काढून शहरातील सर्व जनतेचे लक्ष वेधून घेतले भगवे ध्वज घेऊन युवक जल्लोष करीत होते. फटाक्यांची आतिषबाजी व शोभेची दारु उडवून राम भक्ताने शोभायात्रेमध्ये श्रीराम जय राम जय जय राम चा जयघोष करीत शोभायात्रेमध्ये एका सजवलेल्या रथामध्ये लहान मुलांना श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांचे वेश परिधान करून भव्य मिरवणूक काढली होती औसा शहरातील मुख्य रस्त्यावरून ही शोभायात्रा पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या शोभायात्रेमध्ये हिंदू बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.