सहेरसाठी निघालेले मुस्लिम युवक वारकऱ्यांकरिता बनले "देवदुत"
मध्यरात्री मदत करून सुखरूप केला प्रवास,भाईंचाऱ्यांचे दर्शन
महेबूब बक्षी
औसा
औसा तालुक्यातील कवठा केज येथून मध्यरात्री २:५० वाजण्याच्या सुमारास किर्तन संपवून गावाकडे परतणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीचे ट्यूब फुटल्याने येळी पर्यंतचा ३५ किमी प्रवास कशा करावा.या चिंतेत असणाऱ्या वारकऱ्यांच्या मदतीला औश्यातील मुस्लिम तरूण आले.त्यांनी मध्यरात्री वारकऱ्यांच्या गाडीला ट्युब टाकून त्यांना सुखरूप घरी पोहचण्यासाठी सहकार्य केले.ऐन रमजान महिन्यात व राम नवमीच्या दिवशी औश्यात राष्ट्रीय एकात्मता व भाईचाऱ्यांचे दर्शन घडले.त्यांची सर्वत्र कौतुक होत आहे.
येळी येथील ह.भ.प.सुकाचार महाराजासह ह.भ.प.नामदेव कवठेकर महाराज,विलास येळीकर,चांगदेव पवार हे कवठा केज येथून किर्तन संपवून येळीकडे मध्यरात्री औसा मार्गे जात होते.औसा जवळच आले असता त्यांच्या मोटारसायकलचे टायर ट्यूब फुटले.त्यामुळे मोटारसायकल ढकलत घेवून येथील बसस्थानका समोर आले असता त्यावेळी रमजानच्या उपवासाकरिता सहेरसाठी निघालेल्या मुस्लिम युवकांची नजर यांच्यावर पडली.बाबा शेख,खाजा शेख यांच्यासह त्यांच्या सोबतीने त्यांची विचारपूस करत स्वतः गाडी ढकलूनो नेत मध्यरात्री पंम्चरवाल्यांना उठवून त्यांचे ट्युब बदलून दिले.रात्री ३:३० वाजता येथील पंम्चर दुकानदार सोहेल शेख हा सहेरीकरिता उठला होता.त्यांनेही वारकऱ्यांच्या सेवेकरिता धावून आला,त्यांची गाडी दुरुस्त करून त्यांचा ३५ किमीचा प्रवास सुखरूप केला.एवढेच नव्हे तर वाटेत अडचण आली तर सांगा,आम्ही पाठीमागे येतो.काळजी करू नका महाराज, आमच्या करिता परमेश्वराकडे प्रार्थना करा.वारकऱ्यांनीही त्यांना केलेल्या सहकार्याबद्दल आशीर्वाद दिला.एकंदरीत पवित्र रमजान व राम नवमीच्या दिवशी जो मुस्लिम युवक व वारकऱ्यांत भाईंचाऱ्यांचे दर्शन झाले त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आमच्यासाठी ते देवदुतच
------------------मध्यरात्रीचे ३ वाजले होते.औसा जवळच गाडीचे ट्यूब फुटल्याने मोटारसायकल ढकलून नेण्याची वेळ आली.आपरात्री कुणीही रस्त्यावर नसताना ३५ किमी रस्ता कशा पार करावा.कुठे आराम करावे,कुणाला उठवावे.अशा संकटात असताना हे दोन-तीन युवक आमच्या मदतीला धावून आले.आम्हाला सहकार्य केले,गाडी दुरुस्त करून देत धीर दिला. खऱ्या अर्थाने विठ्ठलाने आपरात्री आमच्यासाठी पाठवलेले ते देवदुतच होते.त्यांना पुन्हा भेटून कृतज्ञाता व्यक्त करायची असल्याचे ह.भ.प.सुकाचार महाराज यांनी सांगितले.
आम्ही आमचा धर्म पाळला
---------------------
पवित्र रमजान महिन्यात सतकार्य करणे,संकटसमयी मदतीला धावणे पुण्य आहे.मध्यरात्री संकटात सापडलेल्या बांधवांची मदत करणे हेच खरे कर्तव्य होते.अल्लाहाने पवित्र कुरआन पाक मध्ये जो संदेश दिला.तोच धर्म आम्ही पाळला.महाराज सुखरूप घरी पोहचले म्हणजेच आमचा रोजा सार्थक झाल्याचे बाबा शेख,खाजा शेख यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.