उपविभागीय पोलिस अधिकारी,लातूर शहर कार्यालयाच्या विशेष पथकाची कार्यवाही. घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस 1 लाख 30 हजार रुपयाच्या मुद्देमालासह 5 तासात जेरबंद

*उपविभागीय पोलिस अधिकारी,लातूर शहर कार्यालयाच्या विशेष पथकाची कार्यवाही. घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस 1 लाख 30 हजार रुपयाच्या मुद्देमालासह 5 तासात जेरबंद.*






           लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

  या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 06/05/2022 ते 12/05/2022 चे दरम्यान राधाकृष्ण नगर, लातूर येथील एका घराचा दरवाजा उघडून घरातून सोन्या-चांदीचे एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचे दागदागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले वगैरे तक्रारी अर्जावरून पोलीस ठाणे शिवाजी नगर येथे येथे दिनांक 12/05/2022 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 222/2022 कलम 380 भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

                  सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता  पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली  विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना देऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

              सदर पोलीस पथकाने लागलीच नमूद गुन्ह्या उघडकीस आणण्याच्या दिशेने गुन्हेगारांची माहिती काढत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे

1) रमेश राठोड, राहणार कोळगाव तांडा तालुका रेनापुर यास रिंग रोड, लातूर येथील एका गॅरेजमधून ताब्यात घेऊन गुन्हा संदर्भाने विचारपूस केली तेव्हा नमूद आरोपीने  सदरचा घरफोडीचा गुन्हा केल्याचे कबूल करून गुन्ह्यात चोरलेला 1,30,000/- रुपयाचा मुद्देमाल सोन्या-चांदीचे दागिने हजर केल्याने  ते गुन्ह्यात जप्त करण्यात आले असून नमूद गुन्ह्यात रमेश राठोड यास अटक करण्यात आलेली आहे.

              पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर)श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अवघ्या 5 तासात आरोपीच्या मुसक्या आवळून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

               सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व पोलीस निरीक्षक श्री. दिलीप डोलारे ,पोलीस ठाणे शिवाजी नगर,लातूर यांचे मार्गदर्शनात विशेष पथकातील सहाय्यक फौजदार रामचंद्र ढगे ,वाहिद शेख, पोलीस अंमलदार महेश पारडे, काकासाहेब बोचरे यांनी पार पाडली.

            गुन्ह्याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या