स्थानिक गुन्हे शाखा, लातूर आणि एम आय डी सी पोलिसांची कामगिरी,25 मोटारसायकली जप्त, मोटारसायकल चोरीचे 18 गुन्हे उघडकीस, एकूण 10 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 04 आरोपी अटक

 *स्थानिक गुन्हे शाखा, लातूर आणि एम आय डी सी पोलिसांची कामगिरी,25 मोटारसायकली जप्त, मोटारसायकल चोरीचे 18 गुन्हे उघडकीस, एकूण 10 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. 04 आरोपी अटक*





लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

     लातूर पोलिसांच्या दोन वेगवेगळ्या कारवाईमध्ये वरील प्रमाणे 25 मोटरसायकली जप्त केल्या असून मोटरसायकल चोरीचे एकूण 18 गुन्हे उघड झाले आहेत. आणि तब्बल 10 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

            यासंदर्भात पहिली कारवाई स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन चोरांना अटक, 17 मोटरसायकली जप्त, 11 गुन्हे उघडकीस ,, ज्यामध्ये 6 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .तर एम आय डी सी पोलिसाकडून एका चोरट्यास अटक ,7 गुन्हे उघडकीस, 4 लाखाचा मुद्देमाल,, आठ मोटरसायकली जप्त केल्या आहेत .


       या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री.गजानन  भातलवंडे, संजीवन मिरकले एम आय डी सीयांचे नेतृत्वात पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.


             पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या विशेषता मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून गुन्हे उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते .


           त्या अनुषंगाने सदर पथके माहितीचे संकलन करीत असताना, माहिती घेत असताना दिनांक 08/ 05/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, नवीन रेणापूर नाका परिसरात चोरीच्या मोटारसायकली खरेदी व विक्री चा व्यवहार होणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथकाने नवीन रेणापूर नाका परिसरात सापळा लावून चोरीच्या मोटरसायकल खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाऱ्या इसमाना ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदरच्या इसमांनी त्यांचे नाव-


1) पवनराज गुलाब चव्हाण, वय 22 वर्ष, राहणार बेलकुंड तालुका औसा, सध्या राहणार अंबा हनुमान मंदिर जवळ, शारदा नगर येथील एका हॉस्टेलमध्ये,लातूर.


2) महादेव शिवाजी गरड उर्फ शुभम पाटील, वय 23 वर्ष व्यवसाय शिक्षण राहणार अंबुलगा तालुका चाकूर सध्या राहणार आंबा हनुमान मंदिराजवळ,शारदा नगर येथील एका हॉस्टेलमध्ये,लातूर


3) अक्षय राव साहेब देमगुंडे, राहणार हिप्परगा, तालुका उदगीर जिल्हा लातूर असे असल्याचे सांगितले 

       

          त्यांच्याकडे आणखीन सखोल विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की, लातूर शहरातील विविध ठिकाणाहून तसेच जिल्ह्या बाहेरून मोटारसायकली चोरून ते एकत्र जमा करतात. फेसबूक वर शुभम पाटील नावाचा फेसबुक अकाउंट ओपन केला असून त्यामार्फत जिल्ह्यातील विविध लोकांना मोटारसायकली विक्री करतात असे सांगितले.


               पोलीस चौकशी मध्ये त्यांनी विविध ठिकाणाहून चोरलेल्या व चोरी करून लपवून ठेवलेल्या एकूण 17 मोटारसायकली किंमत 

6 लाख 38000 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने व 7 मोटरसायकली पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलिसांनी जप्त केलेअसून जप्त केलेल्या मोटारसायकली संदर्भाने लातूर जिल्ह्यात 8 गुन्हे,उस्मानाबाद जिल्ह्यात 2 गुन्हे, सोलापूर जिल्ह्यात 1 गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे ते पुढील प्रमाणे.


1) पोलीस ठाणे विवेकानंद चौक गुन्हा रजिस्टर क्रमांक 230/2022 कलम 379 भादवी.


2)पोलीस ठाणे विवेकानंद चौक गुन्हा रजिस्टर क्रमांक 157/2022 कलम 379 भादवी.


3) पोलीस ठाणे गांधी चौक, गुन्हा रजिस्टर क्रमांक 212/2022 कलम 379 भादवी.


4) पोलीस ठाणे एम आय डी सी, गुन्हा रजिस्टर क्रमांक 797/2021 कलम 379 भादवी.


5) पोलीस ठाणे चाकूर, गुन्हा रजिस्टर क्रमांक 146/2022 कलम 379 भादवी.


6) पोलीस ठाणे छ.शिवाजी चौक, गुन्हा रजिस्टर क्रमांक 215/2022 कलम 379 भादवी.


7) पोलीस ठाणे मुरुड, गुन्हा रजिस्टर क्रमांक 10/2022 कलम 379 भादवी.


8) पोलीस ठाणे मुरुड, गुन्हा रजिस्टर क्रमांक 52/2022 कलम 379 भादवी.


9) पोलीस ठाणे उमरगा जिल्हा उस्मानाबाद, गुन्हा रजिस्टर क्रमांक 23/2022 कलम 379 भादवी.


10) पोलीस ठाणे तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद, गुन्हा रजिस्टर क्रमांक 400/2022 कलम 379 भादवी.


11) पोलीस ठाणे जोडभावे, सोलापूर शहर, गुन्हा रजिस्टर क्रमांक 605/2021 कलम 379 भादवी.


 प्रमाणे गुन्हे दाखल असून या गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेल्या मोटरसायकली मिळून आलेले आहेत.

              सदरची मुलं चैनीसाठी मोटारसायकल चोरी केल्यानंतर सर्व मोटरसायकली एकत्र करून त्याचे नंबर बदलून फेसबुकद्वारे विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच कमी दरात मोटरसायकली मिळत असल्याने कसलीही शहनिशा किंवा खात्री न करता काही नागरिक अशा मोटरसायकलची खरेदी केल्याचे तपासात समोर येत आहे.


               लातूर पोलिसाकडून लातूरकरांना आवाहन करण्यात येते की, ऑनलाइन किंवा सोशल मीडियाच्या इतर माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या वस्तूची, वाहनांची खरेदी विक्री करीत असताना पूर्णपणे खात्री व शहानिशा करूनच व्यवहार करावा.जेणेकरून फसवणूक होणार नाही,किंवा आर्थिक भुर्दंड बसणार नाही.


             सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.गजानन भातलवंडे यांचे मार्गदर्शनात सपोनि राहुल बहुरे , सचिन द्रोणाचार्य,पोलीस अमलदार अंगद कोतवाड, माधव बिल्लापट्टे, राजू मस्के, राजेश कंचे, रवी कानगुले, जमीर शेख, नितीन कठारे, नकुल पाटील यांनी पार पाडली.


        *तर दुसर्‍या एका कार्यवाहीतपोलीस स्टेशन एमआयडीसी, लातूर येथील पोलिसांनी मोटार सायकल चोर केला गजाआड*

आरोपीकडून एकूण आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

पोलीस स्टेशन एमआयडीसी 

1)गु र नं- 240/ 2022 कलम 379 भादवी मध्ये हिरो स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच 32 यू 0173 किंमत 40,000/- रुपये


2)गुरन-241 /22 कलम 379 भादवी मध्ये होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच 13 सी जी -4625 किंमत 70,000/-रुपये


3) गुर नं- 242/22 कलम 379 भादवी मध्ये सुझुकी कंपनीची मोटर सायकल एम एच 24 -S-96 67 किंमत 40 ,000 रुपये 


4) गु र नं-244/22 कलम 379 भादवी मध्ये होंडा पॅशन प्रो मोटरसायकल एम एच 24 A P-18 95 किंमत 60,000/- रुपये


5) गु र नं- 245/22 कलम 379 भादवी मध्ये होंडा कंपनीची सीबीएफ कंपनीची मोसा एम एच 24 -S-8255 किंमत 50,000/- रुपये


6) गुर नं-246 / 22 कलम 379 भादवी मध्ये पॅशन प्रो कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एच 24 -A N-2832 किंमत 50,000/- रुपये


7) गुरनं- 247/ 22 कलम 379 भादवी मध्ये होंडा कंपनीची ड्रीम युगा मोटरसायकल एम एच 24 -A C-0139 किंमत 50,000/- रुपये


8) हिरो होंडा स्प्लेडर MH12 CC 7884 किंमत 40,000/- 

एकूण किंमत- 4,00,000/- रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे


सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक  निखिल पिंगळे साहेब ,माननीय अपर पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब ,माननीय उपविभागीय पोलिस अधिकारी जितेंद्र जगदाळे सो, माननीय पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे स्थागुशा लातूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले पोलिस स्टेशन एमआयडीसी ,सोबत पोलीस हेडकॉन्स्टेबल/1150 बिराजदार,पोह /693 बेल्लाळे,पोलीस नाईक 1369 बुजारे, पोना 1590 मुन्ना मदने ,पोलीस नाईक 610 अर्जुन राजपूत ,पोलीस नाईक 800 किरण शिंदे या सर्वांनी मिळून सदरची कामगीरी केली आहे


   मागिल दोन दिवसात स्थानिक गुन्हे शाखा लातूर व एमआयडीसी पोलसानी वरिष्ठांच्या मार्गर्शनाखाली  25 मोटासायकल किंमत 10 लाख 38 हजार .रू रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या