येलोरी सोसायटीची निवडणूक श्री दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध
येलोरी तालुका औसा जि लातूर येथील विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक चेअरमन दिलीप चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निघाली आहे. या सोसायटी अंतर्गत येलोरी, येलोरी वाडी, रिंगणी या तीन गावांचा समावेश आहे. दिनांक ९ मे २०२२ रोजी चेअरमन म्हणून श्री चंद्रकांत शिवदर्शन पाटील व व्हाईस चेअरमन म्हणून श्री विजयकुमार सर्जे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री मसलगे पी व्ही यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली व चेअरमन व व्हाईस चेअरमन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या वीस वर्षांपासून ही संस्था दिलीप पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहे. दिलीप पाटील यांच्या कारकिर्दीत सोसायटीची उलाढाल ५० लाखांपासून ते आता ५ कोटीच्या घरात आलेली आहे. तो विश्वास कायम ठेवत सोसायटी बिनविरोध काढण्याचे काम केले आहे. या प्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने श्री मसलगे पी व्ही यांचा दिलीप पाटील यांनी शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार केला. तसेच गटसचिव श्री टी डी बनकर, सूर्यवंशी पी जी, येल्लोरीचे गटसचिव अरुण नरखेडकर यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व नूतन संचालक श्री शिवानंद मुळे, कमलाकर रिंगणकर, राजेंद्र येरटे, सिद्धेश्वर बिराजदार, देवराज पाटील, आत्माराम बोचरे, नामदेव सगरे, गंगाराम गुंजिटे, विष्णू सर्जे, सौ कारभारी प्रिया, सौ कुलकर्णी अनघा व सेवक शिवा गायकवाड यांचाही ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोसायटीचे सभासद ऍड संजय कुलकर्णी, हनुमंत बिराजदार, विश्वनाथ कोरे, अमृत बिराजदार, बी ए पाटील, केशव नाना मुळे, रुद्राप्पा बिराजदार, विलास बर्दापूरे, शंकर पाटील, विशाल पाटील, किसन येरटे, मुरली गायकवाड, रामा सगरे, बाळू बिराजदार, शिवा उबाळे, शिवानंद कोरे, मनमथ येरटे, मनमथ निटूरे, चांद मुलाणी, रुद्रप्पा येरटे आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. सोसायटी बिनविरोध काढण्यासाठी तिन्ही गावातील सभासदांनी परिश्रम घेतले याबद्दल श्री दिलीप पाटील यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.