आपण पाहत आहोत रिपोर्टर न्यूज़
महाराणा प्रतापसिंह यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी..
औसा मुख्तार मणियार
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची 482 वी जयंती औसा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आली.
औसा शहरात राजपूत समाजाच्या वतीने आज बस स्थानकाच्या बाजूस हनुमान मंदिराच्या मुख्य चौकात महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, माजी नगराध्यक्ष संगमेश्वर ठेसे,विरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुभाषप्पा मुक्ता,माजी नगराध्यक्ष भरत सूर्यवंशी, मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे,काँग्रेसचे शहराध्यक्ष शकील शेख, प्रा.सुधीर पोतदार, एडवोकेट समीयोद्दीन पटेल, माजी नगरसेवक गोविंद जाधव, गोपाळ धानुरे, समीर डेंग, जयराज कसबे, डॉ. बजरंग दुबे,माजी नगरसेविका जयश्रीताई उटगे, सोनाली गुळबिले, गुन्हे शाखा लातूर चे सपोनि राहुल बहुरे यांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले.
या प्रसंगी राजपूत समाजातील विविध क्षेत्रातील राहुल बहुरे, डॉक्टर .आशिश अशोकसिंह शिलेदार, अर्जूनसिंह ठाकूर,सौ.संतोषी चंदिले,सुधीरसिंह चौहान,दत्ता पंडीत, रणजितसिंह चौहान, सुरेश मिश्रा,रुपेश दुबे,
डॉक्टर नेहा मन्नुसिंह चौहान, या 10 गुणी जणांचा राजपुत समाजाच्या वतीने राजपूत भूषण पुरस्कार व मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मेंद्र बिसेनी यांनी केले, सूत्रसंचालन जयराज ठाकूर यांनी तर आभार संतोष वर्मा यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजपुत महासभा अध्यक्ष संतोषसिंह दिक्षीत,राजनसिंह बायसठाकूर, , काना ठाकूर, बालाजी तोंवर, मुकेश तौर, कुलदीप ठाकूर, अजयसिंह परदेसी, संतोष वर्मा, संतोष ठाकूर यांच्यासह अनेक राजपूत समाज बांधवानी परिश्रम घेतले.
महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजपूत महासभा औसा यांच्या व संजीवनी ब्लड बँक, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात 41रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी संजीवनी ब्लड बँक ,लातूरचे डॉ. बालाजी जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त अटल फाऊंडेशन , औसा च्या वतीने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले .यावेळी फाऊंडेशन चे अध्यक्ष जगदीश परदेशी, गणेश चौहान, मुकेश तोवर, बालाजी तोवर, पत्रकार जयपाल ठाकूर, प्रकाश चौहान, गणेश ,सुमित ठाकूर , विशाल मोरवाल उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.