वारकरी मंडळाच्या औसा तालुका शाखेचे भव्य उद्घाटन संपन्न

 वारकरी मंडळाच्या औसा तालुका शाखेचे भव्य उद्घाटन संपन्न






औसा प्रतिनिधी

 अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज डिकसळ कर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय वारकरी मंडळाचे कार्य अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सुरू आहे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वारकरी मंडळाचे संघटन तसेच वारकरी मंडळाचे उद्देश रचना आणि कार्यपद्धती यांना अनुसरून अखिल भारतीय वारकरी मंडळाची वाटचाल सुरू आहे‌. या मंडळाच्या औसा तालुका कार्यकारिणीचे रचना करण्यात आली असून 40 सदस्य असलेल्या अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या औसा तालुका शाखेचे भव्य उद्घाटन लातूर जिल्हा अध्यक्ष लालासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते आणि संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजुळगे यांच्या अध्यक्षतेखाली येथील मुक्तेश्वर विद्यालयाच्या सभागृहामध्ये संपन्न झाले. औसा तालुक्याच्या शाखा उद्घाटन प्रसंगी जिल्हाध्यक्ष लालासाहेब देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या माध्यमातून वारक-यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू आसे आश्वासन दिले. औसा तालुक्यासाठी वारकरी भवन उभा करण्यासाठी आपण सहकार्य करू अशी यावेळी ग्वाही दिली. भेदाभेद अमंगळ हे ब्रीदवाक्य घेऊन वारकरी मंडळाचे कार्य सुरू असल्यामुळे अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सर्व सदस्यांनी एक दिलाने संघटन कार्य करावे, आणि वारकरी मंडळाच्या माध्यमातून लोकोपयोगी उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा ह .भ. प.वलसे महाराज यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या प्रसंगी व्यासपीठावर प्रसिद्धीप्रमुख राजकुमार सोमवंशी, लातूर जिल्हा उपाध्यक्ष दिनकर निकम, आणि नूतन तालुका अध्यक्ष खंडु महाराज भादेकर यांची उपस्थिती होती. खंडू महाराज यांनी आपल्या वर टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून आपण कार्य करू अशी ग्वाही याप्रसंगी दिली. वारकरी मंडळाचे संघटन मजबूत करण्यासाठी 40 जणांचा समावेश असलेली जम्बो कार्यकारणी यावेळी जाहीर करण्यात आली .आणि प्रत्येकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.  कार्यक्रमासाठी औसा तालुक्यातील शेकडो वारकरी व महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व श्री गोरोबा कुरे, गोविंद पावशे, आत्माराम मिरकले ,शंकर राव जाधव, सौ लक्ष्मीबाई माळी, सौ सुरेखा पाठक, सौ रंजना खुरपे, सतीश जाधव यांच्यासह अनेक जण प्रयत्नशील होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन दगडू पंत जोशी तळणीकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या