मी आर्मीतून बोलतो,आमच्या 50 जवानांची रक्त तपासणी करायची आहे ऑफिसर सोबत व्हॉट्सॲपवर बोला सांगून डॉक्टरांची फसवणूक .

मी आर्मीतून बोलतो,आमच्या 50 जवानांची रक्त तपासणी करायची आहे ऑफिसर सोबत व्हॉट्सॲपवर बोला सांगून डॉक्टरांची फसवणूक .




*'आमच्या दलातील जवानांच्या टेस्ट करायच्या आहेत सांगून डॉक्टरांची फसवणूक करणाऱ्या ONLINE तोतया अधिकाऱ्यांच्या टोळीचा सुळसुळाट*.


               या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, लातूर शहरातील एका हॉस्पिटलच्या डॉक्टरांना रक्त तपासणीच्या नावावर आर्मी अधिकारी असल्याचे सांगून 2 लाख 99 हजाराला लुटल्याची घटना 26/05/2022 रोजी घडली असून "50 जवानांची ब्लडटेस्ट करायची आहे" असे सांगून तोतया अधिकाऱ्याने डॉक्टरांना फसविले. नितेश कुंभार नावाच्या व्यक्तीने फोन केला. व मी आर्मीतून बोलतो,आमच्या 50 जवानांची रक्त तपासणी करायची आहे. त्यांच्यासाठी किती खर्च येणार असे डॉक्टरांना विचारून आरोपीने थोड्या वेळात क्रेडिट कार्डने मी आपल्याला पैसे पाठवितो. आमच्या ऑफिसर सोबत व्हॉट्सॲपवर बोला,असे सांगण्यात आले.

       


      व्हिडिओ कॉलवर फोन करून त्यांना दुसऱ्या मोबाईलने प्रोसेस करायला सांगितले. त्यात त्यांच्या खात्यातील दोन लाख 99 हजार रुपये आपल्या खात्यात वळते करवून घेतले. यासंदर्भात 27 मे रोजी पोलीस ठाणे शिवाजी नगर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 245/2022 भादंविच्या कलम 420 सहकलम 66 (सी), 66 (डी) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे शिवाजी नगर चे पोलीस निरीक्षक श्री. डोलारे हे करीत आहेत.



           लातूर पोलिसाकडून सर्व डॉक्टरांना आवाहन करण्यात येते की, अनोळखी व्यक्तीकडून येणारे कॉल स्वीकारू नये. तसेच त्यांना उपचाराचा बहाणा करून ऑनलाइन पेमेंट करतो असे सांगणाऱ्या पासून सावध रहावे. सध्या बऱ्याच डॉक्टरांना विविध संरक्षण दलातील जवान/अधिकारी असल्याचे भासवून आम्हाला उपचारासाठी ऍडव्हान्स पेमेंट करायचे आहे असे सांगून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे.

           तरी सर्व डॉक्टर्स व रुग्णालयांनी ऑनलाइन व्यवहार करीत असताना खबरदारी व शहानिशा करूनच व्यवहार करावा.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या