गुबाळ येथे संतोष सोमवंशी यांचा सत्कार
औसा :तालुक्यातील गुबाळ येथे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांची महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव होते
औसा बाजार समिती जिल्हा मध्ये तीन नंबर वर आहे तसेच सर्व व्यवहार आँनलाईन असून सौदा सुध्दा आँनलाईन असतो स्वतंत्र वेबसाईट तसेच 100 %इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवण्यास यश आले आहे म्हणून तर आज महाराष्ट्रात उपसभापती म्हणून निवड झाली आहे असे मत संतोष भाऊ सोमवंशी यांनी व्यक्त केले
याप्रसंगी बाजार समिती उपसभापती किशोर जाधव, युवा सेना उपजिल्हा प्रमुख दिनेश जावळे, खरेदी विक्री संघाचे संचालक अजित भोसले, गणेश पाटील मातोळा, धानोरा सरपंच सुरेश मुसळे बाबा देशमुख अभिजीत जाधव संग्राम जाधव गोपाळ होळकर चेअरमन गफुर पटेल अंगद जाधव खलील पटेल अमीन पटेल चॉद शेख आदी सह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.