विजय घाडगे पाटील यांच्या माणुसकीचे दर्शन. शिवली मोड येथे अपघात झालेल्या तरुणाचा प्राण वाचला.
औसा प्रतिनिधी विलास तपासे
विद्यार्थी सेनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांचा 5 मे रोजी वाढदिवस होता औसा शहरामधे कार्यकर्त्यांनी वाढदिवस साजरा करून शुभेच्छा दिल्या विजय कुमार घाडगे हे औश्याहून आपल्या गावाकडे तावशी ताड येथे निघाले होते. शिवली उड्डाणपूलावर बेलकुंड येथील संभाजी पवार या तरुणाचा मोटरसायकल धडकून अपघात झाला होता. जमलेले नागरिक बघ्याची भूमिका घेत होती काही तरुण विडिओ फोटो काढत होते. विजयकुमार घाडगे खाली उतरून तरुणाची विचारपूस केली हा तरुण बेलकुंड चा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या घरी निरोप देईन बेलकुंड प्राथमिक आरोग्य केंद्र व 108 नंबर ला फोन केला विजय कुमार घाडगे यांचा फोन कर्मचाऱ्याने उचलला नसल्यामुळे स्वतः विजयकुमार घाडगे यांनी बेलकुंड आरोग्य केंद्रात भेट देऊन 108 गाडीमधे डॉक्टर व कर्मचार्याला बसवून ॲम्बुलन्सच्या पाठीमागे स्वतः चि गाडी घेऊन घटनास्थळी भेट दिली. जखमी असलेल्या तरुणाला ॲम्बुलन्स मध्ये उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले. वेळे वर उपचार झाल्यामुळे बेलकुंड येथील तरुणाचा प्राण वाचला. हा विडिओ सोशल मीडिया वर गेल्यामुळे विजयकुमार घाडगे याना वाढदिवसाच्या व मदत केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी भरघोस शुभेच्छा दिल्या. असे काम केल्यामुळे खरेच माणुसकीचे दर्शन पाहायला मिळाले.
यांच्या तत्पर मदतीने अपघातग्रस्तांना मिळाला मायेचा आधार. मानसिक व मायेचा आधार देऊन माणुसकीचे दर्शन घडवले याबद्दल अपघातग्रस्तांनी विजय घाडगे पाटील यांचे अपघातग्रस्तांबरोबरच उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.