निम्न तेरणा प्रकल्पच्या सर्व शाखा, शाखाधिकारी, सिंचन कर्मचाऱ्यांसोबत उपविभागीय अधिकारी पाटील यांनी घेतली आढावा बैठक
उन्हाळी हंगामाच्या तिसऱ्या आवर्तनानुसार सिंचन क्षेत्र तपासणी व वाढविण्यासाठी केल्या उपविभागीय अधिकारी पाटील यांनी केल्या सुचना
एस ए काझी
औसा /प्रतिनिधी : - उपविभागीय अधिकारी नितीन बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निम्न तेरणा प्रकल्पावरील सर्व शाखांची, शाखाधिकारी व सिंचन कर्मचारी यांच्या सोबत आढावा बैठक औसा तालुक्यातील किल्लारी येथील मुख्य कालव्या लगत असलेल्या शाखेत आयोजित करण्यात आली होती.
सदरील बैठकीत निम्न तेरणा प्रकल्प
लातूर-उस्मानाबाद अंतर्गत येणाऱ्या मोठ्या, मध्यम, लघु, साठवण तसेच उच्च पातळी बंधारे तथा कोपब बाबतची उन्हाळी हंगामाच्या विस्तृत टिप्पणीसह उन्हाळी हंगामाचा पुर्व आढावा सादर करण्यात आला, तसेच तिसऱ्या अवर्षणानुसार सिंचन क्षेत्र तपासणी व वाढविण्यासाठी सुचना ह्या उपविभागीय अधिकारी नितीन बी पाटील केल्या. यावेळी मान्यवरांचे सत्कार व स्वागत करण्यात आले. तसेच निम्न तेरणा प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या उन्हाळी हंगामाच्या तिसऱ्या अवर्षणानुसार सिंचन क्षेत्र तपासणी व वाढविण्यासाठी माहिती देवून आगामी येणाऱ्या सिंचन वर्षाची व जिल्यातील प्रकल्पांच्या सर्व कामाची सादरीकरण करण्यात आले. या बैठकीस शाखाधिकारी कृष्णा येनगे व शाखाधिकारी शेख चांद व सर्व सिंचन कर्मचारी हजर होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.