वारकरी मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते सत्कार
औसा प्रतिनिधी
अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या औसा तालुका शाखेतील 40 सदस्यांचा समावेश असलेल्या नूतन कार्यकारिणीची पुनर्रचना राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बोधले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष लालासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. या कार्यकारणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विठ्ठलाची प्रतिमा देऊन सत्कार केला. सद्गुरू गहिनीनाथ महाराज यांच्या हस्ते नुतन जिल्हा अध्यक्ष दिनकर निकम, औसा तालुका अध्यक्ष खंडू महाराज भादेकर, उपाध्यक्ष गोविंद तावसे, कोषाध्यक्ष सतीश जाधव, तालुका संघटक गोरोबा कुरे आणि सदस्य दिलीप रूबदे यांचा सत्कार करण्यात आला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.