नांदुर्गा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद
औसा प्रतिनिधी औसा तालुक्यातील नांदुर्गा येथे थोडेसे माय बापा साठी या उपक्रमा अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथील नेत्रचिकित्सक गणराज हाके यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तालुका आरोग्य अधिकारी आर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मातोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी मकरंद जाधव डॉक्टर शिवलिंग शेटे आणि नांदुर्गा येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वाती फेरे यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले औसा तालुक्यातील नांदूर गाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची सतत काळजी घेतली जाते नेत्र रुग्णांना डोळ्याचा नंबर काढून देणे डोळ्यामध्ये मांसल वृद्धि तसेच मोतीबिंदू काचबिंदू इत्यादीची तपासणी करून नेत्र रुग्णावर उपचार करण्यात आले तसेच गरजूंना चष्मे देण्याची व्यवस्था या शिबिरात अंतर्गत करण्यात येणार असल्याने शिबिराच्या लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.