किल्लारी येथे अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात
किल्लारी / अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती किल्लारी येथे शिव मल्हार नगरमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर भाऊ जाधव व वाघंबर कांबळे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साई सर व राजाराम जाधव होते यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता यावेळी विजय दूधभाते,शशिकांत कांबळे, अमोल दूधभाते, वैजीनाथ कांबळे, महादेव बिराजदार, तेजस उस्तुरे, जावेद अंदूरकर , तेजेश सावळगे आदी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी, सुमित दूधभाते, ओमकार बनसोडे, कृष्णा दूधभाते, विकास सुरवसे, महादेव दुधभाते, माहळू घोडके, नितीन सोनटक्के, आदींनी परिश्रम घेतले यावेळी शिव मल्हार नगर मधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.