निराधार संघर्ष समितीच्या वतीने औशात आक्रोश मोर्चा
औसा मुख्तार मणियार
दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करावा अन्यथा विशेष सहाय्य योजनेचा लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य बंद करण्यात येईल ही शासन निर्णय दिनांक 20 ऑगस्ट 2019 आणि दिनांक 13 मे 2021 मधील अठ त्वरित रद्द करावी. आणि विविध मागण्यासाठी निराधार संघर्ष समितीच्या वतीने औसा येथे आक्रोश मोर्चा काढण्याचे आयोजित केले होते.त्या अनुषंगाने दिनांक 5 मे 2022 गुरूवार रोजी सकाळी 11 वाजता किल्ला मैदान येथून तहसिलवर येवून जाहीर सभेत रूपांतर होऊन औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे.या आक्रोश मोर्चात निराधारांनी 20 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयातील दरवर्षी उत्पन्नाचा दाखला देण्याचे बंधन असलेली आठ त्वरित रद्द व्हावी. दरमहा तीन हजार रुपये मानधन मिळावे. एकवीस हजार रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून 50 हजार रुपये वार्षिक करावी. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्ती वयोमर्यादा 65 वर्ष होऊन 58 वर्ष करण्यात यावे. या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून निराधारांचा महाआक्रोश मोर्चा हजारो निराधारांच्याउपस्थितीत काढण्यात आला.यावेळी निराधार संघर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी आक्रोश मोर्चात निराधार संघर्ष समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र मोरे, संयोजक राजीव कसबे,नदीम सय्यद, अंकुश कांबळे,असलमखॉ पठाण,भरत पाटील, हेमंत पाटील, हिरालाल कांबळे, सौदागर वगरे,शितल कांबळे, सुमनबाई कांबळे, उमेश बनसोडे, गंगाधर वाघमारे,दगडु बरडे श्याम जाधव, हरिभाऊ कुलकर्णी, रमाकांत कांबळे, राजेंद्र सगट रानबा कांबळे,औसा तालुक्यातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने या निराधारांच्या महा आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.