जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त पदाच्या
पोटनिवडणुसाठी आदर्श आचार संहिता लागू
लातूर,दि.4(जिमाका):- राज्य निवडणूक आयोग यांनी लातूर जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायतीमधील 73 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सर्वसाधारण प्रवर्गाच्या रिक्त सदस्य पदांच्या निवडणुकींकरिता पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झालेली असून ती सदरील निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंतच्या कलावधीसाठी लागू राहील, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश महाडिक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****
--
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.