खरोसा उपसरपंचपदी शिवसेनेचे विशाल क्षीरसागर
औसा :औसा तालुक्यातील खरोसा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाल क्षीरसागर विजयी झाले आहेत
खरोसा ग्रामपंचायतीची उपसरपंच निवडीची बैठक सरपंच सौ संयोगिता अजय सांळुके यांच्या अध्यक्षतेखाली झाली या निवडी मध्ये उपसरपंच पदासाठी विशाल क्षीरसागर व सौ भाग्यश्री जावळे यांनी अर्ज दाखल केले होते यामध्ये मतदान होऊन 13 पैकी 10 मतदान घेऊन विशाल क्षीरसागर उपसरपंच म्हणून विजयी झाले
या निवडी बद्दल शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
या निवडी वेळी महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष भाऊ सोमवंशी, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव युवा सेना उपजिल्हा प्रमुख दिनेश जावळे महेश सगर सुरेश मुसळे अजय सांळुके जयराज होगले प्रशांत डोके प्रशांत राऊत शरद कांबळे गोविंद मुसांडे खलील शिकलकर मारुती राऊतराव अमर डोके पद्मीन नरवटे आदी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.