उंबडगा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत सहकार सेवा पॅनलचा दणदणीत विजय
औसा /प्रतिनिधी:-उंबडगा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत सहकार सेवा पॅनलचा दणदणीत विजय
औसा तालुक्यातील उंबडगा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहकार सेवा सत्तारूड पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे,
सरकार सेवा सत्तारूढ पॅनलच्या सर्वच्या सर्व 13 जागांवर सुनील बेंबडे यांना सोडून कोणासही मतदान करा आणि चेअरमन करा असे म्हणणाऱ्या विरोधी पॅनलच्या उमेदवारास सुनील बेंबडे यांनी सर्वाधिक 258 मध्ये घेऊन अक्षरशा या निवडणुकीत विरोधी पॅनलला धूळ चारली आहे,विशेष म्हणजे विजयीब उमेदवाराना 250 ते 258 मते तर पराभूत उमेदवारांना 90 ते 100 मते या निवडणुकीत पडले आहेत.सुनील निवृत्तीराव बेंबडे व दत्तात्रय कोळपे यांच्या नेतृत्वाखालील उंबडगा (बुद्रुक व खुर्द )तालुका औसा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व 13 उमेदवार विजयी झाले आहेत.या विजयी उमेदवारांना निवडणूक अधिकारी यांनी प्रमाणपत्र दिले. विजयी उमेदवारांचे अभिनंदन.केले.
या निवडणुकीत पॅनम प्रमुख सुनील बेंबडे यांनी मतदारांचे रूण व्यक्त केले आहेत.तसेच आपण सहकार सेवा सत्तारूड पॅनल मधील सर्व उमेदवाराना भरघोस मतांनी ज्या विश्वासाने निवडून दिला आहात त्या विश्वासास आम्ही पात्र राहून सदोदीत सभासदांचे व संस्थेचे हित जोपासून कार्य करणार असल्याची बालताना सांगितले,
या निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या संस्थेचे सभासद,गावातील जेष्ट मंडळी,सामाजिक कार्यकर्ते,विविध खात्यातील सेवानिवृत कर्मचारी व आधिकारी,भजणी मंडळे,विविध संघटनाचे पदाधिकारी,तरूणमित्र,
ज्ञात व अज्ञात मंडळी,सहकार खात्यातील संबधित अधिकारी व कर्मचारी या सर्वांचे आभार सुनिल बेंबडे यांनी व्यक्त केले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.