आपण पाहत आहोत रिपोर्टर न्यूज़ आज ची बातमी मुख़्तार मणियार यांच्या कडून
लोकनेते विलासराव देशमुख ग्रामीण क्रिकेट चॅम्पियनशिप चा अंतिम सामना औशात एस एच क्रिकेट टीम ने पटकावला
औसा- श्रीशैल उटगे जिल्हाध्यक्ष कॉग्रेस लातुर यांच्या मार्गदर्शना खाली लोकनेते विलासरावजी देशमुख ग्रामीण क्रिकेट चॅम्पियनशिप T-ट्वेंटी औसा स्पर्धा आज अंतिम सामना खेळून संपन्न झाल्या. यात एस एच एंड अहेड क्रिकेट टीम औसा प्रथम तथा बाबा देशमुख क्रिकेट औसा टीम यांचा द्वितीय विजेते ठरल्या. प्रथम टीम ला 51000 रूपये ट्राॅफी व प्रमाणपत्र व द्वितीय टीमला 31000 रूपये ,ट्राॅफी व प्रमाणपत्र,तसेच मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज यांना प्रमुख पाहूणे कॉंग्रेस तालुकाध्यक्ष दत्तोपंत सुर्यवंशी, कॉग्रेस शहराध्यक्ष शकीलभाई शेख , OBC कॉग्रेस मराठवडा अध्यक्ष प्रा सुधिर पोतदार खुंदमिर मुल्ला, रवी पाटिल, आदम खॉ पठाण , हमिद सय्यद, राजेंद्र बनसोडे, जयराज ठाकुर, भागवत म्हेञे, सुलतान शेख, नियामत लोहारे, दिपक कांबळे, आसीफ लोहारे, मुस्तफा अलुरे आदि मान्यवर व आयोजकांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शहराध्यक्ष शेख शकिलभाई, दत्तोपंत सुर्यवंशी, खुंदमिर मुल्ला,मुज्जमिल शेख.रवी पाटिल,नियामत लोहारे,भागवत म्हेञे, हाजी शेख, दिपक कांबळे, खाजा शेख , आसीफ लोहारे, मुस्तफा अलुरे,खुंदमिर हन्नुरे, जयराज ठाकुर, हकिम शेख, जकयोद्दिन पटेल, यांनी आभार व्यक्त केला.
एकूण ४८ टीमने सहभाग नोंदविला.दहा दिवस चाललेल्या या स्पर्धेचे कमी दिवसात अत्यंत देखणे व शिस्तबद्ध नियोजन ,दोन्ही टीमचे समर्थक,पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमी व मोठ्या प्रमाणात युवक प्रेक्षक हजर होते.
विजेती टीम S H & अहेड क्रिकेट टीम ही आजपासून चालू असलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेस भाग घेईल. त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.