उदगीर येथे बोगस डिग्री अधारे मिळविली नोकरी* *विद्यापीठाने पदवी फेक असल्याचे दिले लेखी पत्र

 *उदगीर येथे बोगस डिग्री अधारे मिळविली नोकरी*

*विद्यापीठाने पदवी फेक असल्याचे दिले लेखी पत्र.*





उदगीर प्रतिनिधी: उदगीर येथील जमुहर माध्यमिक उर्दू शाळा येथे कार्यरत शिक्षक नामे जहागीरदार महमूदअली रुस्तमअली यांचे बी.ए. हिंदी चे गुणपत्र व प्रमाणपत्र खोटे व बनावटी आहे म्हणून सदर शाळेचे संस्था सचिव यांना जय नारायण विद्यापीठ जोधपुर चे परिक्षा नियंत्रक यांनी पत्र दिले आहे की सदर गुणपत्र व प्रमाणपत्र खोटे व बनावटी आहे. सदर पत्राच्या अनुषंगाने सिद्ध झाले आहे की सदर शिक्षकाचे बी.ए. हिंदीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र खोटे आहे सदर खोटे गुणपत्रा आधारे एम.ए. हिंदी चे अभ्यास व पदवी प्राप्त करणे खोटे व गुन्हा आहे व फसवणूक केली आहे सदर शिक्षक पदवीचे खोटे व बनावट गुणपत्रा आधारे शासनाकडून अप्रोल व शिक्षक पद मान्यता मिळवून प्रत्येक महिन्याला पगार घेऊन शासनाची फसवणूक व भ्रष्टाचार केले आहे. 

सदर प्रकरणाची माहिती संस्था सचिव व मुख्याध्यापक यांना असून त्यांनी त्या शिक्षकांशी संगणमत करून स्वतःच्या फायद्यासाठी अद्याप कसलीच व कोणतीच कार्यवाही केली नाही त्यामुळे दिलेल्या तक्रारी प्रमाणे सदर शिक्षका विरुद्ध चौकशी करून त्याचे अप्रोल रद्द करून पगार बंद करून सेवेतून बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी शिक्षण उपसंचालक विभाग लातूर यांना निवेदनाद्वारे तक्रार दिली आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या