खा.सुप्रियाताई सुळे यांच्यासमवेत लातुरातील सीएंची चर्चा
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या शाखेकडून अडचणींचे सादरीकरण
लातूर/प्रतिनिधी:लातूर दौऱ्यावर आलेल्या खा.
सुप्रियाताई सुळे यांनी लातुरातील चार्टर्ड अकाऊंटंटसना निमंत्रण देवून त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडियाच्या लातूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा करत अडचणींचे सादरीकरण करण्यात केले.
लातूर येथील शासकीय विश्रामगृहात सीएंनी खा.सुळे यांची भेट घेतली. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, आ.बाबासाहेब पाटील,आ.विक्रम काळे,बसवराज पाटील,अफसर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या लातूर शाखेचे अध्यक्ष द्वारकादास भूतडा,उपाध्यक्ष विश्वास जाधव, सचिव राहुल धरणे,कोषाध्यक्ष महेश तोष्णीवाल,विद्यार्थी संघटना अध्यक्ष एकनाथ धर्माधिकारी,सदस्य निलेश बजाज,विद्यावती वांगे यांनी यावेळी खा.सुळे यांच्याशी चर्चा केली.दैनंदिन कामात येणाऱ्या अडचणी तसेच व्यावसायिक सुधारणांच्या दृष्टिकोनातून विविध विषय त्यांच्या कानावर घातले.
करण्यात आलेल्या सूचना त्यांनी ऐकून घेतल्या.शासकीय कामात येणाऱ्या अडचणींची नोंद घेऊन या संदर्भात प्रशासनाला योग्य ते प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन खा.सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना दिले.लातूर शहरातील सीएंची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.