*विविध विकृती विरुद्ध पुकारलेले बंड म्हणजे झुंड : माधव बावगे*:
( प्रतिनिधी )साहित्यातून समाजाचे प्रतिबिंब उमटत असते. त्यातून समाज प्रबोधन घडत असते. राष्ट्रीय एकात्मता बांधणीसाठी प्रभावी साहित्य उपयोगी ठरते. तसेच साहित्यातून चळवळी निर्माण होतात. असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे 'मातृ दिनी' महा. अंनिसच्या जिल्हा बैठकीत शिंदे मिलिंद' लिखित "झुंड" कवितासंग्रह प्रकाशन प्रसंगी केले. यावेळी विचारपिठावर विनायक सावळे, सुनिता आरळीकर, अनिल दरेकर, रुक्साना मुल्ला, अपसिंगेकर, महेंद्र गांधले, सुमेध शिंदे आदि उपस्थित होते. पुढे बोलताना माधव बावगे म्हणाले की, 'कवी मिलिंद शिंदे' यांची कार्यकर्ता ते साहित्यिक अशी वाटचाल आहे. ते छत्र्भरती या चळवळीतले कार्यकर्ते, एक हाडाचा कार्यकर्ता आहे. इतर पुरोगामी, परिवर्तनवादी विचारसरणी त्यांनी जोपासली असल्यामुळे निश्चितच त्यांच्या लिखाणात विद्रोह असणारचं, असे सांगून, 'नागराज मंजूळे' दिग्दर्शित "झुंड" सिनेमा आणि मिलिंद शिंदे लिखित "झुंड" काव्यसंग्रह हे दोन्ही समाजप्रबोधनाचे कार्य करतात. कवी भारतपुत्र यांनी ग्रामीण, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी यांच्या व्यथा या काव्यसंग्रहात त्यांनी मांडलेल्या आहेत. विविध विकृती विरुद्ध पुकारलेले बंड म्हणजे 'झुंड' असे ते शेवटी बोलताना म्हणाले. यावेळी झुंड काव्यसंग्रहाचे कवी शिंदे मिलिंद यांनी आई माऊली ही कविता सादर केली. शिक्षक, विद्यार्थी, कार्यकर्ते व काव्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन रूक्साना मुल्ला यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.