तहसिल कार्यालय खानापूर-विटा येथे अमृत जवान अभियान 2022 अंतर्गत आजी माजी* *सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन*

 *प्रतिनिधी समीर तांबोळी*


*तहसिल कार्यालय खानापूर-विटा येथे अमृत जवान अभियान 2022 अंतर्गत आजी माजी*

*सैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन* 







अमृत जवान अभियान 2022 अंतर्गत, माजी सैनिक, शहीद जवान व सेवेत कार्यरत असलेले सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या समस्या सोडविण्यासाठी मा. अध्यक्ष अमृत जवान सन्मान अभियान समन्वय समिती तथा उपविभागीय अधिकारी विटा यांचे अध्यक्षतेखाली  तहसिलदार कार्यालय खानापूर विटा या ठिकाणी खानापूर विटा तालुक्यातील आजी माजी सैनिकांचे अडी-अडचणी, समस्या सोडविणेचे अनुषंगाने सैनिक मेळाव्याचे आयोजन करणेत आले. सदर मेळाव्यामध्ये तालुकेतील सर्व विभागाचे कार्यालय प्रमुख तसेच तालुकेतील आजी माजी सैनिक उपस्थित होते. सदर अभियानाचे अनुषंगाने तहसिल कार्यालय खानापूर विटा येथे सहायता कक्ष स्थापन करणेत आला असून सदर कक्षात दुपारी 12 ते 3 या वेळेत कार्यरत सैनिक, माजी सैनिक व त्यांचे निकटवर्तीय यांचे विविध विभागांकडील अर्ज स्विकारणेत येत आहेत. सदर मेळाव्यामध्ये एकूण 10 अर्ज प्राप्त झालेले आहेत. प्राप्त झालेले अर्जापैकी गट विकास अधिकारी पं.सं. विटा यांचे कार्यालयाशी संबंधित 02 अर्ज, मुख्याधिकारी न.पं. विटा यांचे कार्यालयाशी संबंधित 01 अर्ज, महसूल विभागाशी संबंधित 06 अर्ज, सहायक निबंधक सहकारी संस्था विटा यांचेशी संबंधित 01 अर्ज असून सदरचे अर्ज संबंधित विभागाचे कार्यालय प्रमुख यांचेकडे पुढील उकार्यवाहीसाठी पाठविणेत आलेले आहेत.

तसेच यापूर्वी दिनांक 22.04.2022 रोजी देखिल सैनिक दरबाराचे आयोजन करणेत आलेले होते. सदर दिवशी एकूण 18 अर्ज प्राप्त झाले असून प्राप्त झालेले अर्जापैकी गट विकास अधिकारी पं.सं. विटा यांचे कार्यालयाशी संबंधित 02 अर्ज, सहायक निबंधक सहकारी संस्था विटा यांचेशी संबधित 02 अर्ज, महसूल विभागाशी संबंधित 09 अर्ज, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग विटा यांचेशी संबंधित 01 अर्ज, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती विटा यांचे विभागाशी संबंधित 01 अर्ज, उपअधिक्षक भूमिअभिलेख खानापूर विटा विभागाशी संबंधित 01 अर्ज, मुख्याधिकारी नगर पंचायत विटा विभागाशी संबंधित 01 अर्ज, जिल्हा संधारण अधिकारी मृदा व जलसंधारण विभाग वारणाली या विभागाशी संबंधित 01 अर्ज असून सदरचे सर्व अर्ज ज्या-त्या संबंधित विभागाचे कार्यालय प्रमुख यांचेकडे पाठविणेत आलेले आहेत. पाठविणेत आलेल्य अर्जावर नियमानुसार तात्काळ कार्यवाही करून संबंधित अर्जदारास कळविणेबाबत संबंधित कार्यालय प्रमुख यांना सुचना देणेत आलेल्या आहेत. तसेच विभाग प्रमुखांकडे पाठविणेत आलेल्या अर्जावर कोणती कार्यवाही केली त्याचा पूर्तता अहवाल दिनांक 13 जुन 2022 रोजी होणा-या मेळाव्यादिवशी समक्ष सादर करणेबाबत मा. अध्यक्ष अमृत जवान सन्मान


अभियान समन्वय समिती तथा उपविभागीय अधिकारी विटा यांनी संबंधित कार्यालय प्रमुख यांना सुचना दिलेल्या


आहेत. तसेच, अमृत जवान अभियान 2022 अंतर्गत पुढील मेळावा दिनांक 13 जुन 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय खानापूर विटा येथे होणार असलेने तालुकेतील आजी माजी सैनिक व त्यांचे निकटवर्तीय यांनी आपले अडी अडचणी संदर्भातील अर्ज तहसिलदार कार्यालय खानापूर विटा येथे स्थापन करणेत आलेल्या सहायता कक्षात सादर करून आपल्या समस्यांचे निराकरण करून घेणेत यावे असे आवाहन मा. अध्यक्ष अमृत जवान सन्मान अभियान समन्वय समिती तथा उपविभागीय अधिकारी विटा यांनी तालुकेतील सर्व आजी माजी सैनिकांना केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या