नाथ संस्थान औसा च्या वतीने संतोष सोमवंशी यांचा सत्‍कार

 नाथ संस्थान औसा च्या वतीने संतोष सोमवंशी यांचा सत्‍कार





औसा :औसा येथील नाथ संस्थान च्या वतीने श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरु हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते संतोष भाऊ सोमवंशी यांची महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या उपसभापती पदी निवड झाल्याबद्दल पांडूरंगाची मुर्ती देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभाशीर्वाद दिले

औसाचे नाव या निवडी मुळे महाराष्ट्र भर झाले आहे याचा आम्हाला अभिमान आहे असे उद्गार सद्गुरु हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी काढले

याप्रसंगी खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, बाजार समितीचे उपसभापती किशोर जाधव, धानोरा सरपंच सुरेश मुसळे, बाजार समितीचे सचिव संतोष हुच्चे, रुपेश कारंजे आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या