आपण पाहत आहोत रिपोर्टर न्यूज़
औशात काँग्रेस कमिटीच्या वतीने नगर पालिका निवडणूक संदर्भात बैठक संपन्न..
औसा प्रतिनिधी मुख्तार मणियार
औसा नगरपालिका निवडणूक 2 हज़ार बाविस संदर्भात औसा शहर काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांची बैठक आयोजित केली होती. त्या अनुषंगाने 9 मे 2 हज़ार बाविस सोमवार रोजी रात्री नऊ वाजता शासकीय विश्रामगृह औसा येथे नगरपालिका निवडणूक 2 हज़ार बाविस संदर्भात कॉंग्रेसचे पक्षीनिरीक्षक एडवोकेट समद पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी होऊ घातलेल्या औसा नगरपालिका निवडणूक 2 हज़ार बाविस संदर्भात चर्चा झाली. येणाऱ्या काळात मतदारांमध्ये जाऊन काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्याची सूचना पक्ष निरीक्षक यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्ष निरीक्षक एडवोकेट समद पटेल यांना सूचना दिली. यावेळी काँग्रेस कमिटीच्या वतीने पक्ष निरीक्षक एडवोकेट समद पटेल याचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.यावेळी नगरपालिका निवडणूक 2 हज़ार बाविस संदर्भात या बैठकीत कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शकील शेख, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, युवा कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हणमंत राचट्टे, अल्पसंख्याकचे जिल्हा उपाध्यक्ष आदमखॉ पठाण,माजी नगरसेवक एडवोकेट समीयोद्दीन पटेल,अंगद कांबळे, अल्पसंख्याकचे शहराध्यक्ष सय्यद हमीद , कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अल्ताफ देशमुख, मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बनसोडे,मुजम्मील शेख, यांनी या बैठकीत आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात कॉंग्रेसचे जेष्ठ नेते खाजामिया कुरेशी,धम्मदीप जाधव, एडवोकेट फैय्याज पटेल,अनीस जहागीरदार,सचीन चौहान,व्यंकट जाधव,नियामत लोहारे, ओबीसी सेलचे अध्यक्ष भागवत म्हेत्रे, मोहसीन शेख, हमीद सर,जहुर बागवान,नजीर बागवान, पुरुषोत्तम नलगे, शेख शब्बीर टेलर,राजभाऊ,चांदभाई,हकीम शेख या मान्यवरांची या निवडणूकीच्या चर्चेच्या बैठकीच्या संदर्भात उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.