पुढारी वृत्तसेवा समुहाचे औसा तालुका प्रतिनिधी जयपाल ठाकुर सर
*चांगले सहकारी मोठे बंधू म्हणून माझे जीवन व्यापून टाकणारे माझे मार्गदर्शक गुरु*
......
*"कर्म तेरे अच्छे है*
*तो किस्मत तेरी दासी है!*
*नियत तेरी अच्छी है*
*तो घर तेरा मथुरा काशी है"*
या म्हणीची साक्षात प्रचिती म्हणजे माझे स्नेही मित्र तथा गुरुवर्य जयपाल ठाकुर सर होय...
संघर्ष हा पाचवीला पुजलेला असतांना या संघर्षाला संधी मानून नेटाने पुढे चालणारे, अपयश आले म्हणून हार न मानता प्रयत्नाची कास न सोडणारे, जीवनात खूप कमी मित्र जमविणारे पण ज्याच्याशी मैत्रीचे बंध जुळले त्याच्या पाठीमागे आणि कोणत्याही प्रसंगात खंबीरपणे उभा राहणारे, आपली ओळख कोणाचा मित्र म्हणून नव्हे तर आपल्या कर्तुत्वाने निर्माण करणारे, आपल्या मार्फत अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवून त्यांच्या मनातील प्रश्नांची उकल करून योग्य दिशेने वाटचाल करण्याचा अनमोल सल्ला देणारे, गोरगरिब विद्यार्थ्यांना आपल्या शिकवनीने , अनेकांना , शासकीय सेवेत पाठवण्यात सिंहांचा वाटा असणारे,अलिप्तता हा अनुभवाने आलेला गुण असला तरी कोण कसा आहे याचा विचार करून आपली वाटचाल करणारे, शून्यातून विश्व निर्माण करतांना कधीही वाम मार्गाचा अवलंब न करता मेहनतीच्या जोरावर आपली स्वप्ने साकारणारे, शिक्षकी पेशा असूनही सगळे गुण शंभू महादेवाचे... भोळा आणि सहज विश्वास ठेवणारे पण तिसरा डोळा उघडला तर भल्या भल्याना घाम फोडणारे... *माझे गुरु एक चांगले स्नेही मित्र तथा शिक्षक*.. *कोणाच्याही संकटात वेळप्रसंगी मदतीला धावणारे..*.. *माझे व अनेक तरुण विद्यार्थी यांचे मार्गदर्शक गुरु* ... *सर्वांचे चांगलं व्हावं यासाठी धडपडणारे* माझे मित्र जयपाल ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे... माझ्या मार्गदर्शक मित्र, व मानलेल्या मोठ्या भावाला दीर्घायुष्य लाभो, त्यांची सर्व स्वप्ने साकार होवोत, त्यांचे आरोग्य उत्तम राहून त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो हीच त्या विधात्या जवळ मागणी...
.
✍🏻✍🏻 *शब्दांकन*✍🏻✍🏻
*पांचाळ विठ्ठल*
*राज्य व मराठवाडा स्तरीय उत्कृष्ट वार्तांकन पत्रकारिता
पुरस्कार प्राप्त*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.